
भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) यांचा घटस्फोट झाला आहे. १२ वर्षाच्या सुखी संसारानंतर आता हे दोघं विभक्त झाले असून त्यांना चार वर्षाचा एक मुलगा आहे. २०१० मध्ये सानिया आणि शोएब मलिकच्या लग्नाची जेवढी चर्चा झाली होती तेवढीच चर्चा सध्या या दोघांच्या घटस्फोटाची देखील होत आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या नात्यातमध्ये दुरावा आल्याच्या चर्चा सुरु होत्या. यावर आता शोएबच्या जवळच्या एका व्यक्तीने याबाबत स्पष्टीकरण दिल्याने शिक्कामोर्तब झाला आहे.
सानिया आणि शोएबच्या घटस्पोर्टच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता त्यांच्या नात्यात दुरावा कोणामुळे आला याबाबत चर्चा सुरु आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार, शोएब मलिक सध्या दुसऱ्या एका तरुणीला डेट करत आहे. सानिया सोबत विवाह झालेला असताना शोएबचे विवाह बाह्य संबंध होते अशी माहिती मिळत आहेत. सानिया आणि शोएबच्या नात्यात पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल आयशा उमर आल्यामुळे या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. आयशा उमर आणि शोएब मलिक यांनी जवळपास वर्षभरापूर्वी एका प्रोजेक्टच्या निमित्ताने बोल्ड फोटोशूट केले होते. नंतर, त्याचबद्दल बोलताना, मलिकने एका मुलाखतीदरम्यान आयशाची प्रशंसा केली आणि सांगितले की त्यांच्या शूटिंग दरम्यान तिने मला खूप मदत केली. या फोटोशूटनंतर शोएब आणि आयशा मध्ये जवळीक निर्माण झाली असल्याचे बोलले जात आहे.
आयशा उमर एक पाकिस्तानी अभिनेत्री आणि लोकप्रिय युट्युबर आहे. ती दीर्घकाळापासून मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध चेहरा आहे. ती पाकिस्तानातील सर्वात फॅशनेबल अभिनेत्रींपैकी एक आहे. आयशा पाकिस्तानातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. ‘कॉलेज जीन्स’, ‘कुछ लम्हे जिंदगी क्या’, ‘मेरी जात जरा ए बेनेशन’, ‘दिल को मना आया नहीं’, ‘जिंदगी गुलजार है’, ‘बुलबुले’ यांसारख्या अनेक टेलिव्हिजन मालिकांमधील प्रमुख भूमिकेसाठी ती ओळखली जाते. ‘मेरी गुडिया’, ‘मेरा दर्द बेजुबां’ आणि बरेच काही.