Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाकुंभातील मोनालिसाला चित्रपटाची ऑफर देणाऱ्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय ?

दिल्लीतल्या बलात्काराच्या प्रकरणामध्ये सनोज मिश्राला अटक करण्यात आली आहे. एका छोट्या शहरात राहणाऱ्या तरूणीने दिग्दर्शकावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 31, 2025 | 06:43 PM
महाकुंभातील मोनालिसाला चित्रपटाची ऑफर देणाऱ्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय ?
Follow Us
Close
Follow Us:

प्रयागराज येथे पार पडलेल्या महाकुंभमेळ्यातील मोनालिसा नावाची तरूणी कमालीची चर्चेत राहिली आहे. ती सोशल मीडियावर तिच्या लूकमुळे चर्चेत आली होती. या मोनालिसाला प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक सनोज मिश्रा याने चित्रपटाची ऑफर सुद्धा दिली होती. आता त्याच बॉलिवूड दिग्दर्शकाचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. दिल्लीतल्या बलात्काराच्या प्रकरणामध्ये सनोज मिश्राला अटक करण्यात आली आहे. एका छोट्या शहरात राहणाऱ्या तरूणीने दिग्दर्शकावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. तिला फिल्म स्टार बनवण्याचे अमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप मिश्रा यांच्यावर करण्यात आला आहे.

‘आंबट शौकीन’ कुटुंबाची रंजक गोष्ट, पाहायला मिळणार तीन मित्रांची धमाल गोष्ट; मोशन पोस्टर रिलीज

दिल्ली उच्च न्यायालयाने दिग्दर्शकाचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याला अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ मार्च २०२४ रोजी, दिग्दर्शकाविरुद्ध बलात्कार, हल्ला, गर्भपात करण्यास भाग पाडणे आणि धमकी देणे यासारख्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३० मार्च रोजी, दिग्दर्शक सनोज मिश्राला गाझियाबाद येथून अटक करण्यात आली असून सध्या तो नबी करीम पोलिस ठाण्यात अटक करुन ठेवण्यात आली आहे. २८ वर्षीय तरुणीने पोलि‍सांना दिलेल्या माहितीनुसार, २०२० मध्ये टिकटॉक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ती तरुणी सनोज मिश्रा यांच्या संपर्कात आली. तेव्हा ती झाँसीमध्ये राहत होती.

प्रवाशांनी कृपया लक्ष द्या “मुंबई लोकल” ११ जुलैला येत आहे, मोशन पोस्टर रिलीज

काही दिवसानंतर ते दररोज बोलू लागले. त्यांच्यात दररोज बोलणं होऊ लागल्यानंतर सनोजने त्या तरुणीला १७ जून २०२१ रोजी कॉल करुन तो झाँसी रेल्वे स्थानकावर असल्याचे सांगितले. शिवाय तिला त्याने भेटायलाही बोलवलं. पण त्या तरुणीने दिग्दर्शकाला भेटण्यास नकार दिला, तेव्हा मिश्राने जर तू मला भेटायला आली नाही तर, आत्महत्या करेन अशी धमकी दिली. दिग्दर्शकाने दिलेली धमकी ऐकून पीडित तरूणी त्याला दुसर्‍या दिवशी भेटण्यास तयार झाली. १८ जून २०२१ रोजी मिश्रा तिला रिसॉर्टवर घेऊन गेला आणि तेथी तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केले. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार त्याने घटनेचा अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि तिने विरोध केला तर ते व्हिडीओ लीक करण्याची धमकी दिली.

‘मी पाठीशी आहे’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची अखेर वाट मोकळी, केव्हा होणार सिनेमा रिलीज

पीडितेने पुढे असा दावा केला आहे की, लग्नाचे तसेच चित्रपटात भूमिका देण्याचे खोटे आश्वासन देऊन तो वारंवार तिचे शोषण करत राहिला. सनोज चार वर्षांपासून तिचे शारीरिक शोषण करत आहे. चित्रपट अभिनेत्री बनण्याची आकांक्षा असलेल्या महिलेने दावा केला की ती मुंबईत मिश्रासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती. महिलेच्या म्हणण्यानुसार, शोषणादरम्यान, दिग्दर्शकाने तिला तीनदा गर्भपात करण्यास भाग पाडले. पोलिसांना दिलेल्या जबाबात पीडितेने म्हटले की, प्रथम सनोज मिश्राने लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. यानंतर, त्याने तिला चित्रपटांमध्ये काम करण्याचे आमिष दाखवले आणि कोणालाही काहीही सांगायचे नाही, हे देखील सांगितले. नंतर त्याने लग्नाचे वचनही मोडले. तथापि, नंतर महिलेने तिचे म्हणणे बदलले आणि कोणतीही कारवाई न करण्याची विनंती केली.

सूरज चव्हाणसोबत “झापुक झुपूक” चित्रपटात दिसणार मराठी इंडस्ट्रीतील तगडी स्टारकास्ट, धमाकेदार पोस्टर रिलीज

महाकुंभमेळा २०२५ मध्ये व्हायरल झालेल्या मोनालिसाला चित्रपटाची ऑफर दिल्यानंतर मिश्रा चांगलाच चर्चेत आला होता. कुंभमेळ्यात मोनालिसाच्या सौंदर्याची चांगलीच चर्चा झाली होती, तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. मोनालिसा व्हायरल झाल्यानंतर तिला चित्रपटाची ऑफर मिळाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. काही दिवसामंतर सनोज मिश्रा याने देखील आगामी चित्रपट द डायरी ऑफ मनीपूर मध्ये मोनालिसाला संधी देणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच त्याने मोनालिसाला अभिनयाचे प्रशिक्षण देणार असल्याचेही म्हटले होते. सनोज तिला घेऊन काही कार्यक्रमांमध्ये देखील गेला होता.

Web Title: Sanoj mishra arrested in connection with rape case director offered film viral girl monalisa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2025 | 06:43 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood Film
  • Bollywood News
  • Film Director

संबंधित बातम्या

81व्या वाढदिवसाला Saira Banu यांचे X वर पदार्पण, पहिल्याच पोस्टमध्ये झाल्या भावूक; दिलीप कुमारांची आठवण
1

81व्या वाढदिवसाला Saira Banu यांचे X वर पदार्पण, पहिल्याच पोस्टमध्ये झाल्या भावूक; दिलीप कुमारांची आठवण

1 Lakh To 100 Crore : बॉलीवूडचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! जाणून घ्या जॅकी श्रॉफचे 1 लाख कसे झाले 100 कोटी
2

1 Lakh To 100 Crore : बॉलीवूडचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! जाणून घ्या जॅकी श्रॉफचे 1 लाख कसे झाले 100 कोटी

Bigg Boss 19 च्या सेटवरून Salman Khan चा पहिला लूक समोर, भाईजानचा स्वॅग Viral
3

Bigg Boss 19 च्या सेटवरून Salman Khan चा पहिला लूक समोर, भाईजानचा स्वॅग Viral

Bigg Boss 19 मध्ये होणार राजकीय नेत्यांची एंट्री? ‘ही’ दोन नाव चर्चेत
4

Bigg Boss 19 मध्ये होणार राजकीय नेत्यांची एंट्री? ‘ही’ दोन नाव चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.