The release of the marathi movie Mi Pathishi Aahe is finally here when will the film be released
श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्म यांची अनोखी सांगड घालणारा ‘मी पाठीशी आहे’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आली आहे. २८ मार्चला रिलीज होणारा हा चित्रपट काही तांत्रिक कारणामुळे प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आले आहे चित्रपटाला सेन्सॉर सर्टिफिकेट मिळण्यास विलंब झाल्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
चित्रपट आता २८ मार्चच्या ऐवजी ४ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून सर्टिफिकेट वेळेत न मिळाल्याने २८ मार्चला होणारे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. या विलंबामुळे निर्माते आणि संपूर्ण टीमला आर्थिक नुकसान तसेच मानसिक ताण सहन करावा लागला. परंतु, मनसे नेते व चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी हस्तक्षेप केल्यानंतर सेन्सॉर बोर्डने सर्टिफिकेट दिले असून चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.
गुढीपाडव्याच्याच दिवशी किरण मानेंवर दुःखाचा डोंगर, अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन
चित्रपटाचे दिग्दर्शक पराग सावंत म्हणतात, “चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आम्ही सर्व तयारी केली होती, मात्र सेन्सॉर सर्टिफिकेटसाठी झालेल्या विलंबामुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली. मराठी चित्रपटांना न्याय मिळवून देण्यासाठी अमेय खोपकरांचा नेहमीच पाठिंबा असतो. याचा अनुभव आम्हालाही आला. त्यांच्यामुळेच आम्हाला न्याय मिळाला असून ‘मी पाठीशी आहे’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. याबद्दल आम्ही अत्यंत आनंदी आहोत.”
निर्माते मयूर अर्जुन खरात म्हणतात, “सेन्सॉर बोर्डच्या हलगर्जीपणामुळे स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त चित्रपट प्रदर्शित करू शकलो नाही, याचे दुःख निश्चितच आहे. या प्रकरणामुळे आम्हाला मानसिक त्रासही झाला. मात्र, अमेय खोपकर आमच्या मदतीला धावून आले व चित्रपटाचे प्रदर्शन शक्य झाले. त्यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले. यासाठी त्यांना मनःपूर्वक धन्यवाद.”
ऑफबीट प्रॉडक्शन, नित्यसेवा प्रॅाडक्शन आणि वेरा प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे कथा, संकलन आणि दिग्दर्शन पराग अनिल सावंत यांनी केले असून मयूर अर्जुन खरात, लक्ष्मीकांत कांबळे, ॲड. शुभांगी किशोर सोनवले, प्रमोद नंदकुमार मांडरे, शितल सोनावणे, ऋतुजा नरेंद्र कदम, अनिल गावंड आणि केतन कल्याणकर या स्वामींच्या सेवेकरांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. संजय नवगिरे, दिलीप परांजपे यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली असून संजय नवगिरे यांनी चित्रपटाचे संवादही लिहिले आहेत. तर चित्रपटातील गाण्यांना कबीर शाक्य यांना संगीत सेवा करण्याची संधी लाभली आहे. या चित्रपटात सक्षम कुलकर्णी, सतीश पुळेकर, अरुण नलावडे, सुहास परांजपे, वर्षा प्रभु, श्रीकांत पाटील, अश्विनी चवरे, प्रसाद सुर्वे, शितल सोनावणे, सूचित जाधव, श्रद्धा महाजन, राजवीर गायकवाड, वैष्णवी पोटे यांच्या प्रमुख भूमिका असून माधुरी पवार, संदेश जाधव आणि नूतन जयंत हे विशेष पाहुणे म्हणून झळकणार आहेत.