बिग बजेट सिनेमांना टक्कर देत ‘रुखवत’ने दाखवली मराठी चित्रपटसृष्टीची ताकद, दोन दिवसांत किती कमाई केली?
महाराष्ट्रातील लग्नसराई आणि पारंपरिक रितींची अनोखी गोष्ट सांगणारा “रुखवत” चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील नवीन गाणं ‘ऋतु प्रेमवेडा’ हे नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित झालं आहे. सोनू निगम आणि बेला शेंडे यांच्या गोड आणि भावस्पर्शी आवाजाने सजलेल्या या गाण्याने मराठी संगीतविश्वात उत्साह निर्माण केला आहे. बऱ्याच दिवसांनी प्रेक्षकांना सुरेल आवाजाची जुगलबंदी ऐकण्याचा हा अनोखा अनुभव मिळेल. गौरव चाटी यांच्या सुमधुर संगीताने आणि विक्रांत हिरनाईक यांच्या भावपूर्ण शब्दांनी सजलेलं हे गाणं प्रेम, विरह, आणि ऋतूंच्या बदलत्या छटांची सुंदर अनुभूती देते. हे गाणं प्रत्येक संगीतप्रेमीच्या हृदयाला भिडेल.
वडील जीवंत असतानाही मुलांनी केलं श्राद्ध, ‘वनवास’चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा मीडिया एंटरटेनमेंट ग्रुप द्वारे प्रस्तुत आणि रब्री प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाचा १५ नोव्हेंबर २०२४ रोजी पोस्टर लाँच झाला आहे. लग्नसराईतील “रुखवत” परंपरेचं आकर्षण आणि गूढता मांडणाऱ्या या पोस्टरने लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शिवाय प्रेक्षकांना ‘ऋतु प्रेमवेडा’ गाण्याच्या माध्यमातून परंपरा आणि गूढता यांची अनोखी सांगड पाहायला मिळेल. तसेच पोस्टर लाँच दरम्यान, या चित्रपटाच्या कथेची गोडी आणि आकर्षण स्पष्टपणे दिसून आली, आणि प्रेक्षकांच्या मनात “रुखवत” परंपरेबद्दल नवा उत्साह निर्माण झाला. संतोष जुवेकर, प्रियदर्शिनी इंदलकर,अशोक समर्थ,अभिजीत चव्हाण आणि राजेंद्र शिसातकर हे ‘रुखवत’ या चित्रपटात खास भूमिकेत दिसणार आहेत.
या चित्रपटाची निर्मिती ब्रिंदा अग्रवाल यांनी केली असून उद्योजक म्हणून, त्यांनी नेहमीच मनोरंजन आणि संस्कृतीच्या क्षेत्रात नवकल्पकतेला प्रोत्साहन दिले आहे. त्यांचा दृषटिकोन आणि उत्पादनाची गुणवत्ता “रुखवत” मध्ये दिसून येईल. प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम प्रधान यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून आपल्या कथा आणि चित्रणाद्वारे दर्शकांना वेगवेगळ्या अनोख्या अनुभवांची वासना दिली आहे. “रुखवत” मध्ये त्यांनी सांस्कृतिक धारा आणि थ्रिलर कथानक यांचे सुंदर मिश्रण लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. रुखवत हा चित्रपट अल्ट्रा मीडिया & एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत, रब्री प्रोडक्शन निर्मित आणि निर्माती ब्रिंदा अग्रवाल द्वारे १३ डिसेंबर २०२४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
‘फुलवंती’ चित्रपटाची सक्सेस पार्टीत कलाकारांची मांदियाळी, केलं जबरदस्त सेलिब्रेशन