(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
अनिल शर्मा दिग्दर्शित ‘वनवास’ चित्रपटाचा ट्रेलर काही तासांपूर्वीच सोशल मीडियावर रिलीज झालेला आहे. वडील आणि मुलाच्या नात्यावर भाष्य करणारा ‘वनवास’ चित्रपट येत्या २० डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. हृदयस्पर्शी कथानक असणाऱ्या ह्या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये पोस्टर आणि टीझर रिलीज झाल्यापासून जोरदार चर्चा होत आहे. त्यानंतर आता ट्रेलरची चर्चा होताना दिसत आहे.
‘फुलवंती’ चित्रपटाची सक्सेस पार्टीत कलाकारांची मांदियाळी, केलं जबरदस्त सेलिब्रेशन
सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलेल्या ह्या ट्रेलरबद्दल बोलायचं तर, चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेता उत्कर्ष शर्मा आहे. ट्रेलरच्या सुरूवातीला नाना पाटेकर आणि त्यांची पत्नी आपल्या मुलांसोबत मजेत जगत असतात. आयुष्याच्या सुरुवातीला नाना त्यांच्या कुटुंबासोबत मजेत क्षण घालवताना दिसत आहेत. त्यानंतर ट्रेलर काही वर्ष पुढे जातो. त्यामध्ये, वाराणसीच्या एका धार्मिक मेळाव्यातल्या गर्दीत नानांची आणि त्यांच्या मुलाची ताटातूट होते. आपली मुलं अशी एकट्याला टाकून कशी गेली? याचा नानांना धक्का बसतो. पुढे ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याबद्दल माहिती पोलिसांना सांगतात.
नानांच्या परिवाराला ते न मिळाल्यामुळे त्यांच्या मुलांनी आणि पत्नीने श्राद्ध केलेलं असतं. वडील जिवंत असतानाही, त्यांनी हा कारनामा केलेला असतो. आपले वडिल नेमके कुठे आहेत ? नक्की जिवंत आहेत की नाही ? या कुठल्याही गोष्टीची खातरजमा न करता त्यांची मुलं त्यांचं श्राद्ध उरकतात. नानांची मुलं इतक्या वरंच थांबत नाहीत, त्यांनी वडिलांचं डेथ सर्टिफिकेटही काढलंय. वाराणसीला अडकलेल्या नानांना मात्र मुलांवर विश्वास असतो. मग पुढे नानांना त्यांच्या घरी पोहोचवायला मदत करण्यासाठी उत्कर्ष शर्माची एन्ट्री होते. तो नानांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी कशाप्रकारे मदत करतो? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.
शोबिता शिवन्नाच्या आत्महत्याचं सत्य उघड; पोलिसांच्या हाती लागली सुसाईड नोट, सांगितले कारण!
दरम्यान, ‘गदर’, ‘गदर २’ आणि ‘जिनियस’ या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या अनिल शर्मा यांनी ‘वनवास’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत नाना पाटेकर, उत्कर्ष शर्मा, राजपाल यादव आणि सिमरत कौर आहेत. येत्या २० डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.