मराठी चित्रपटसृष्टीत फार कमी वेळा चित्रपट ५० दिवसांपेक्षा जास्त काळ थिएटरमध्ये आपली जादू टिकवतो. ‘फुलवंती’चित्रपटाने ५० दिवसांचा यशस्वी टप्पा पूर्ण केला असून प्रेक्षकांच्या उदंड प्रेमाने हा चित्रपट अजूनही थिएटरमध्ये गाजत आहे. या यशस्वी प्रवासाचा आनंद साजरा करण्यासाठी खास सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
Phullwanti Success Party Photos
‘फुलवंती’ चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि स्नेहल तरडे ह्यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. दोघींसाठीही हा चित्रपट खूपच खास ठरला असून नुकताच चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.
मराठी चित्रपटसृष्टीत फार कमी वेळा चित्रपट ५० दिवसांपेक्षा जास्त काळ थिएटरमध्ये आपली जादू टिकवतो. तशी जादू प्राजक्ता माळीच्या ह्या ‘फुलवंती’ने करून दाखवली आहे. तिच्या चित्रपटाने ५० दिवसांपेक्षा जास्त काळ थिएटरमध्ये राहण्याचा विक्रम करून दाखवला आहे.
सॅकल्निक ट्रेड ॲनालिस्टने दिलेल्या माहितीनुसार, ‘फुलवंती’ चित्रपटाने ५० दिवसांत जगभरात ६.६७ कोटींची कमाई केलेली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपट ॲमेझॉन प्राईमवर देखील प्रदर्शित झाला असून तिथेही ‘फुलवंती’ला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
चित्रपटाला थिएटरमध्ये आणि ओटीटीवर मिळत असलेला प्रतिसाद पाहून या यशस्वी प्रवासाचा आनंद साजरा करण्यासाठी खास सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी चित्रपटाच्या संपूर्ण टीमसह अमृता खानविलकर हिने विशेष उपस्थिती दर्शवून या पार्टीला चारचांद लावले.
यावेळी प्राजक्ता आणि अमृताने 'मदनमंजिरी' या जबरदस्त लावणीवर कमाल सादरीकरणही केले. या सक्सेस पार्टीत सर्वच टीमने हे यश साजरे केले. या चित्रपटाचे संवाद, लेखन आणि दिग्दर्शन अनुक्रमे प्रवीण विठ्ठल तरडे आणि स्नेहल प्रवीण तरडे यांनी केले आहे. तर छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये सांभाळली आहे.