बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर हा अभिनेता आणि अभिनेता पंकज कपूरचा मुलगा आहे. मात्र, तो नेहमी स्वत:ला बाहेरचा माणूस म्हणून सांगतो. का? या प्रश्नाचे उत्तर शाहिदने त्याच्या संघर्षाचे दिवस आठवत दिले आहे. एवढेच नाही तर शाहिदने आपल्या चर्चेत नेपो किड्सचाही (Shahid Kapoor On Nepotism) माचार घेतला आहे. शाहिद म्हणाला, ‘बीएमडब्ल्यूमध्ये फिरण्यात आणि त्यानंतर करिअरच्या सुरुवातीला दुसरी बीएमडब्ल्यू खरेदी करण्यात काय मजा आहे?’
[read_also content=”कट्टर समजल्या जाणाऱ्या सऊदी अरबमध्ये परिवर्तन, पहिल्यांदा देशाची सुंदरी मिस यूनिवर्स स्पर्धेत भाग घेणार! https://www.navarashtra.com/movies/rumy-alqahtani-participating-as-saudi-arabias-first-miss-universe-contestant-nrps-518210.html”]
शाहिद कपूर ‘नो फिल्टर नेहा’ च्या ताज्या भागात म्हणाला, “प्रत्येकजण म्हणतो की तो पंकज कपूरचा मुलगा आहे आणि तुम्हाला माहित आहे का की या इंडस्ट्रीत पात्र कलाकारांची ताकद नाही. मोठ्या चित्रपटांमध्ये काम करणारे दिग्दर्शक, निर्माते आणि सुपरस्टार यांच्याकडेच ताकद असते. जर तुम्ही बीएमडब्ल्यूमध्ये फिरण्यास सुरुवात केली आणि नंतर दुसरी बीएमडब्ल्यू खरेदी केली तर त्यात मजा काय आहे?”
आपल्या संघर्षमय दिवसांची आठवण करून देताना शाहिद कपूर म्हणाला, “मी श्यामक (दावर, कोरिओग्राफर) पासून सुरुवात केली. अगदी शेवटी उभे राहायचो. सुपरस्टारच्या मागे उभे राहणं सोडा, मी तर माझ्या सहकाऱ्यांच्या मागे उभा राहायचो. पहिल्या ओळीत पोहोचण्यासाठी खूप मेहनत केली. प्रत्येक पावलावर मी कठोर परिश्रम केले हे मला आवडते. बीएमडब्ल्यूमध्ये बसून धडपड करणे हा काही संघर्ष नाही. संघर्ष तेव्हा होतो जेव्हा तुम्हाला ट्रेनमध्ये प्रवास करावा लागतो, फोटोशूटसाठी पैसे कुठून येतील याचा विचार करावा लागतो.
शाहीदचा तेरी बातो में ऐसा उलझा जिया हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांसहीत बॅाक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच्या सध्याच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झालं तर शाहिदनं त्याच्या आगामी ‘देवा’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू केली आहे. हा एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट असून या चित्रपटाचे दिग्दर्शन रोशन एंड्रयूज करत आहेत.