
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
रिअॅलिटी टीव्ही जज आणि डान्सर मलायका अरोरा यांनी तिचा मुलगा अरहान खानसह “स्कार्लेट हाऊस” हे आलिशान रेस्टॉरंट सुरू केले आहे. मुंबईतील वांद्रे येथील पाली व्हिलेजमधील ९० वर्षे जुन्या इंडो-पोर्तुगीज बंगल्यात असलेले हे रेस्टॉरंट शहरातील सेलिब्रिटींसाठी एक आवडते जेवणाचे ठिकाण बनले आहे. स्कारलेट हाऊस शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचे जेवण इथे उपलब्ध आहे. ज्याच्या किमती प्रभावी आहेत, जसे की मसाला खिचडी ₹५५० ला, शॅम्पेन ₹२०,९०० ला आणि ‘एंटी एजेंट’ पाणी ₹३५० ला अन्नपदार्थांच्या किमती चकीत करणाऱ्या आहेत.
मलायका अरोरा तिचा मुलगा अरहान, रेस्टॉरंटर्स धवल उदेशी आणि मलायया नागपाल यांच्यासोबत या रेस्टॉरंटचे सह-मालक आहेत. एका आलिशान विंटेज बंगल्यात असलेल्या या रेस्टॉरंटची रचना ग्रामीण साधेपणा आणि ग्रामीण आतील सजावटीने प्रेरित आहे. स्कारलेट हाऊसमध्ये जुन्या आठवणी आणि इतिहासाचे एक अनोखे आकर्षण आहे. २,५०० चौरस फूट आकाराचे हे रेस्टॉरंट, ज्यामध्ये कॉफी बार, वाइन रूम आणि डायनिंग एरियासह अनेक वेगळे विभाग आहेत, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हे रेस्टॉरंट उघडण्यात आले.
‘घराचे दार बंद केले अन्…’ कन्नड अभिनेत्री Nandini CM ने केली आत्महत्या; कुटुंबियांना धरले जबाबदार
मलायका अरोराचे रेस्टॉरंट
मलायका अरोराने तिच्या रेस्टॉरंट, स्कारलेट हाऊसमध्ये भारतातील पहिला हायड्रेशन बार लाँच केला आहे. हायड्रेशन बारमध्ये थकवा, कमी प्रतिकारशक्ती, त्वचा निस्तेज होणे, बरे होणे आणि इतर अनेक समस्या दूर करण्यासाठी मदत करणारे खास पेये आणि स्मूदीज उपलब्ध आहेत. प्रति बाटली ₹३५० मध्ये एंटी एजेंट इन्फ्युज्ड वॉटरपासून ते त्याच किमतीत हँगओव्हर-बस्टिंग ड्रिंक्सपर्यंत, मेन्यूमध्ये विविध पर्याय उपलब्ध आहेत.
विविध पेये उपलब्ध
कोल्ड-प्रेस्ड ज्यूस देखील येथे उपलब्ध आहेत, जे निरोगी केस राखण्यास मदत करतात – बीटरूट, कोकम, डाळिंब, टरबूज, कढीपत्ता आणि लिंबू सारख्या घटकांसह, ज्याची किंमत ₹४५० आहे. नॉन-अल्कोहोलिक पेये ₹६५० ते ₹७०० पर्यंत आहेत. अल्कोहोलिक पेये देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. फॅन्सी कॉकटेलपासून ते ₹२०,९०० मध्ये सर्वात महागड्या शॅम्पेनपर्यंत, स्कारलेट हाऊसमध्ये प्रत्येकासाठी काहीतरी आहे.
मसाला खिचडी ₹५५० रुपयांची
या रेस्टॉरंटच्या मेन्यूमध्ये कॅज्युअल जेवणापासून ते अत्याधुनिक पदार्थांपर्यंत सर्व काही आहे. १०० आसनांच्या या रेस्टॉरंटमध्ये मसाला खिचडी ₹५५० मध्ये, अॅव्होकाडो टोस्ट ₹६२५ मध्ये आणि व्हेजिटेरियन फिग अँड बुर्राटा ब्लिस सॅलड ₹७२० मध्ये मिळते. मलायकाच्या स्कारलेट हाऊसमध्ये लुधियाना-शैलीतील पांढरे बटर चिकन ₹७५० मध्ये मिळत आहे.