फोटो सौजन्य - Social Media
बॉलीवूडचा किंग खान म्हणून जगभर नावाजलेला शाहरुखने पुन्हा एकदा भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकावले आहे. शाहरुखने तो फक्त बॉलीवूडचा नव्हे तर संपूर्ण भारतीय सिनेजगताचा बादशाह असल्याचे दाखवून दिले आहे. शाहरुख खानने स्वित्झरलँडमध्ये आयोजित असलेल्या लोकार्नो फिल्म फेस्टिवलमध्ये भारतचे प्रतिनिधित्व केले आहे. विशेष म्हणजे शाहरुख खानला यंदाच्या पार्डो अल्ला कैरिएरा पुरस्काराने गौरवले गेले आहे. शाहरुख खानला हे पुरस्कार सिनेमाच्या जगातील त्यांच्या योगदानामुळे दिले गेले. या फिल्म फेस्टिव्हल मध्ये, शाहरुख ब्लॅक लुकमध्ये दिसून आले होते. काळ्या रंगाचे शर्ट आणि पँटसह त्यावर मॅचिंग ब्लेजरमध्ये शाहरुख सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता. यादरम्यान शाहरुखने त्यांच्या अनोख्या अंदाजात मनोगत व्यक्त केले आहे.
पार्डो अल्ला कैरिएरा पुरस्कार २०२४ स्वीकारल्यानंतर शाहरुख म्हणतो कि,” लोकार्नोमधील ही संध्याकाळ अतिशय सुंदर, सांस्कृतिक आणि हॉट आहे. सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद कि तुम्ही इतक्या सुंदर रीतीने माझे स्वागत केलात. सिनेमा हे एक प्रभावी कलात्मक माध्यम आहे यावर माझा विश्वास आहे. मी भाग्यवान आहे की मी या क्षेत्राचा एक भाग होऊ शकलो. माझ्या अय प्रवासात मी खूप काही शिकलो आहे. जिथे प्रेम असते तिथेच क्रिएटिव्हिटी असते. प्रेम, क्रिएटिव्हिटी तसेच आपलेपणाची जाणीव माझ्यासाठी साऱ्या एकच गोष्टी आहेत.”
King Khan stole our hearts at Locarno! From thanking the crowd to feeling right at home like in India, he truly is a global gem! 💖✨@iamsrk @FilmFestLocarno#ShahRukhKhan #Locarno77 #PardoAllaCarriera #GlobalSuperstar #LocarnoFilmFestival #KingKhan pic.twitter.com/YHufzACQnt
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) August 10, 2024