अभिनेता संजय कपूरची (sanjay kapoor) मुलगी शनाया कपूरने (Shanaya Kapoor) अजुनही मोठ्या पडद्यावर पदार्पण केलेले नसले तरी, तिचे इन्स्टाग्रामवर मिलियनमध्ये फॉलोअर्स आहेत. शनाया उत्तम डान्सर असून, तिचे अनेक रिल्स व्हायरल होत असतात. तरूणांमध्ये तिची क्रेझ खूप पहायला मिळते. नुकताच शनाया कपूरने गायिका नेहा कक्करच्या गली गली में फिरता है….या गाण्यावर बेली डान्स केला आहे. (instagram reel) (suhana khan)
या रिलमध्ये शनायाबरोबर शाहरूख खानची मुलगी आणि तिची बेस्ट फ्रेंड सुहाना खानही नाचताना दिसत आहे. शनाया कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे रील शेअर केलं आहे. ज्यामध्ये ती गली गली गाण्यावर नाचताना दिसत आहे. शनाया उबर-कूल दिसत आहे असून, तिने बॅगी ब्लॅक ट्रॅक पॅंट आणि ब्लॅक-अँड-व्हाइट स्नीकर्ससह निऑन ग्रीन ब्रॅलेटची निवड करून तिच्या मिड्रिफची प्रशंसा केली. तिच्या किलर डान्स मूव्हने तिचे चाहते थक्क झालेत.
https://www.youtube.com/shorts/A8jnbrHm52s
शनाया कपूर आणि सुहाना खान बेस्ट फ्रेंड्स आहेत, आणि अनेकदा एकमेकींना हायपिंग करताना आणि इन्स्टाग्रामवर एकमेकींचं कौतुक करताना पहायला मिळाल्यात.
[read_also content=”….अखेर माधुरी थिरलकी त्या ट्रेंडीग गाण्यावर, बहरला माधुरीचा ‘मधुमास’ https://www.navarashtra.com/entertainment/madhuri-dixit-dance-on-baharla-madhumas-412716/”]
शनाया कपूर करण जोहरच्या शशांक खेतानच्या बेधडक या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात लक्ष्य लालवानी आणि गुरफतेह पिरजादा यांच्याही भूमिका आहेत.