संग्रहित फोटो
शनिवारी पहाटे दीडच्या सुमारास हडपसर भाजी मंडई परिसरात हा प्रकार घडला आहे. आरोपींनी महापालिकेचे सुरक्षा रक्षक आकाश लक्ष्मण कोठावळे (वय २७) यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात कोठावळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी जखमी सुरक्षा रक्षकाच्या वडिलांनी काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा : हॉटेलसमोर जुन्या वादाचा थरार, तरुणावर चाकूने हल्ला करून हत्या; सहा आरोपी ताब्यात
दहा कार आणि बसची तोडफोड
सुरक्षा रक्षकावर हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. पळून जात असताना त्यांनी जेएसपीएम महाविद्यालयाजवळील आदर्शनगर परिसरात रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची कोयत्याने तोडफोड केली. आरोपींनी तब्बल दहा कार आणि एका बसचे नुकसान करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून दोन आरोपींना अटक केली. वाहनांच्या तोडफोडीप्रकरणी आरोपींविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपी सिद्दार्थ खिलारी याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विनायक गुरव करीत आहेत.
Ans: महापालिकेचे सुरक्षा रक्षक आकाश लक्ष्मण कोठावळे (वय २७) यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. ते गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Ans: मोहम्मद हुसैन ऊर्फ अज्जु शब्बीर शेख आणि अविनाश सतिश केकाण या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सिद्दार्थ खिलारी हा आरोपी फरार आहे.
Ans: होय. सुरक्षा रक्षकावर हल्ला केल्यानंतर आरोपींनी आदर्शनगर परिसरात दहा कार आणि एका बसची कोयत्याने तोडफोड केली. याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






