
shankar mahadevan breathless hanuman chalisa
गायक आणि संगीतकार शंकर महादेवन (Shankar Mahadevan) यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी एकाहून एक खास गाणी देत रसिकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरात त्यांच्या संगीताने त्यांना ओळख आणि प्रेम दिले आहे.
[read_also content=”न्यासा बॉलिवूडमध्ये येणार का ? अजय देवगणचं महत्त्वाचं विधान , म्हणाला… https://www.navarashtra.com/movies/ajay-devgan-comment-about-nyasas-bollywood-entry-nrsr-267999.html”]
अनेक वर्षांपूर्वी शंकर यांनी गायकीमध्ये एक अभिनव प्रयोग करत श्वास न घेता अर्थात ब्रेथलेस (Breathless) संकल्पनेची बॉलिवुडमध्ये सुरुवात केली होती. त्यांचा ब्रेथलेस संकल्पनेवरचा अल्बम कमालीचा लोकप्रिय झाला होता. आता तसाच श्वास न घेता शंकर महादेवन (Shankar Mahadevan) यांनी गायलेल्या ब्रेथलेस हनुमान चालीसाचा व्हिडिओ (Breathless Hanuman Chalisa) सादर करण्यात आला आहे. त्यांचा हा व्हिडिओ शेमारू भक्तीच्या (Shemaroo Bhakti) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
– Shemaroo Bhakti (@shemaroobhakti) 12 Apr 2022
या व्हिडिओमध्ये शंकर महादेवन अप्रतिमरित्या हनुमान चालीसा गाताना दिसत आहेत. हा हनुमान चालिसा एकदमच ब्रेथलेस आहे. ही वेगवान रचना गायला अतिशय कठीण आहे. हा अनोखा हनुमान चालीसा शेमारू भक्तिच्या यू-ट्यूब चॅनलवरही स्ट्रीम केला जाईल.