Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनयानंतर शरद पोंक्षे नव्या भूमिकेत, मुलगा स्नेह पोंक्षेसोबत घेऊन येणार चित्रपट; रिलीज डेट जाहीर

प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये स्नेह, सक्षम आणि आदित्य हे तीन मित्र प्रवासाला निघालेले दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर प्रवासाबद्दची उत्सुकता, आत्मविश्वास झळकत आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 15, 2025 | 04:54 PM
अभिनयानंतर शरद पोंक्षे नव्या भूमिकेत, मुलगा स्नेह पोंक्षेसोबत घेऊन येणार चित्रपट; रिलीज डेट जाहीर

अभिनयानंतर शरद पोंक्षे नव्या भूमिकेत, मुलगा स्नेह पोंक्षेसोबत घेऊन येणार चित्रपट; रिलीज डेट जाहीर

Follow Us
Close
Follow Us:

मैत्री आणि आत्मशोधाचा सुंदर संदेश देणाऱ्या ‘बंजारा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून येत्या १६ मे रोजी हा चित्रपट सिक्कीमची सफर घडवतानाच मैत्रीचीही अनोखी सफर घडवणार आहे. वी. एस. प्रॉडक्शन्स आणि मोरया प्रॉडक्शन्स सादर करत असणाऱ्या या चित्रपटाची कथा, पटकथा, लेखन आणि दिग्दर्शन स्नेह पोंक्षे याने केले असून या चित्रपटात शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेह पोंक्षे, सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर रोहिणी विजयसिंह पटवर्धन आणि शरद पोंक्षे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

‘छावा’ पाहिल्यानंतर कतरिना कैफची पहिली प्रतिक्रिया, म्हणते, ‘फक्त प्रेमातच नाही तर…’, तुम्हीही म्हणाल बायको असावी तर अशी

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये स्नेह, सक्षम आणि आदित्य हे तीन मित्र प्रवासाला निघालेले दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर प्रवासाबद्दची उत्सुकता, आत्मविश्वास झळकत आहे. पोस्टरमधून ‘बंजारा’ हा केवळ साहसी प्रवास नसून तो भावनिक आणि मानसिक पातळीवर बदल घडवणारा, स्वतःचे स्वप्न जगण्याची प्रेरणा देणारा प्रवास असल्याचे अधोरेखित होतेय. या तीन मित्रांचा हा प्रवास त्यांच्या मैत्रीला एक अनोखी दिशा देणारा असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठीही ‘बंजारा’ हा एक अद्भुत अनुभव ठरणार आहे.

निर्माते शरद पोंक्षे म्हणतात,” ही खरंतर माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने स्नेह दिग्दर्शनात पदार्पण करत असून अभिनयही करत आहे आणि त्याच्या या चित्रपटाची निर्मिती करण्याची संधी मला मिळत आहे. यापेक्षा आनंददायी काय असू शकते. यानिमित्ताने भरत आणि सुनील या माझ्या मित्रांसोबत बऱ्याच काळाने मला एकत्र कामही करता आले. मुलगा म्हणून नाही परंतु स्नेहने या चित्रपटासाठी घेतलेली मेहनत मी पाहिली आहे. ‘बंजारा’ हा चित्रपट प्रत्येकाच्या मनात दडलेल्या स्वप्नांचा शोध घेणारा असून प्रवासप्रेमी, साहसी व्यक्ती आणि निखळ मैत्री अनुभवणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘बंजारा’ एक खास भेट ठरणार आहे.

प्रेक्षकांच्या अफलातून प्रतिसादानंतर विकी कौशलची पहिली पोस्ट! म्हणाला, “छावा तुम्ही खऱ्या अर्थाने जिवंत…”

दिग्दर्शक स्नेह पोंक्षे म्हणतो, “यापूर्वी मी सहदिग्दर्शक म्हणून काम केले आहे. ‘बंजारा’च्या निमित्ताने मी दिग्दर्शक म्हणून समोर येत आहे. यासाठी मी बाबा, सुनील बर्वे आणि भरत जाधव यांचे विशेष आभार मानेन. कारण त्यांचा अनुभव आणि सहकार्य मला चित्रपटासाठी लाभले आहे. माझ्या या प्रवासात मला त्यांची खूप मदत झाली. तसेच माझे सहकलाकार सक्षम आणि आदित्य यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवही कमाल होता. मुळात आमचा वयोगट सारखा असल्याने हा चित्रपट आम्हाला जगता आला. आम्ही ही केमिस्ट्री प्रेक्षकांना पडल्यावर दिसेलच.”

Web Title: Sharad ponkshe bharat jadhav suniel barve starrer banjara marathi movie poster released on instagram see new posters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2025 | 04:54 PM

Topics:  

  • marathi film

संबंधित बातम्या

१२ वर्ष लिव्ह-इन रिलेशननंतर अभिनेता सारंग साठ्येनं केले लग्न, सोशल मीडियावर शेअर केले PHOTO
1

१२ वर्ष लिव्ह-इन रिलेशननंतर अभिनेता सारंग साठ्येनं केले लग्न, सोशल मीडियावर शेअर केले PHOTO

‘लास्ट स्टॉप खांदा…’ चित्रपटाचे कलरफुल पोस्टर लाँच, श्रमेश बेटकरसोबत दिसणार ‘ही’ अभिनेत्री
2

‘लास्ट स्टॉप खांदा…’ चित्रपटाचे कलरफुल पोस्टर लाँच, श्रमेश बेटकरसोबत दिसणार ‘ही’ अभिनेत्री

‘बिन लग्नाची गोष्ट’ मधील पाहिलं गाणं रिलीज, प्रिया बापट आणि भारती आचरेकरचा लाभला आवाज
3

‘बिन लग्नाची गोष्ट’ मधील पाहिलं गाणं रिलीज, प्रिया बापट आणि भारती आचरेकरचा लाभला आवाज

Bal Karve: ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4

Bal Karve: ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.