श्रद्धा कपूरचा ब्लॉकबस्टर हॉरर कॉमेडी ‘स्त्री २’ ओटीटीवर रिलीज, कुठे पाहता येणार? जाणून घ्या
Stree 2 All Over Records : श्रद्धा कपूर, राजकुमार राव आणि पंकज त्रिपाठी स्टारर ‘स्त्री २’ चित्रपट १५ ऑगस्टला रिलीज झाला आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर महिन्याभरातच या चित्रपटाने भारतात शिवाय परदेशातही धमाकेदार कमाई करत स्वत:च्या नावावर नवीन इतिहास रचला आहे. कालच अमर कौशिक दिग्दर्शित ‘स्त्री २’ चित्रपटाने हिंदीमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये समावेश झाला आहे. या हॉरर कॉमेडी चित्रपटाने शाहरूख खानच्या ‘जवान’ चित्रपटालाही सर्वाधिक कमाई करत मागे टाकलं आहे. चित्रपटाने महिन्याभरात आजवर एक- दोन नाही तर तब्बल २६ रेकॉर्ड्स मोडले आहेत. जाणून घेऊया, रेकॉर्ड्सबद्दल….
हे देखील वाचा – ‘स्त्री २’ने थेट किंग खानच्या ‘जवान’लाही टाकलं मागे, असा कोणता रेकॉर्ड मोडला?
‘स्त्री’ प्रमाणेच ‘स्त्री २’ नेही जबरदस्त कमाई केलेली आहे. चित्रपटाने आजवर देशासह परदेशात ८०० कोटींची कमाई केलेली आहे. चित्रपटाने पुढीलप्रमाणे रेकॉर्ड्स मोडित काढले आहे, देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट, देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेला सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट, सर्वात मोठा नॉन-ॲक्शन चित्रपट, २०२४ मधील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट, PVR- Inox चा सर्वात मोठा चित्रपट, Movie Max चा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट, मॅडॉकचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट, श्रद्धा कपूरच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट, राजकुमार रावच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट, अमर कौशिकच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट
पेड प्रीव्ह्यू असणारा चित्रपट (थिएटरमध्ये रिलीज होण्याअगोदर ठराविक प्रेक्षकांनी चित्रपट पाहणे), तीन चित्रपट एकत्र रिलीज होऊनही सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट, दुसऱ्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट, दुसऱ्या आठवड्यातल्या रविवारी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट, दुसऱ्या आठवड्यातल्या रविवारी 40 कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट, दुसऱ्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट, तिसऱ्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट, तिसऱ्या आठवड्यातल्या रविवारी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट, तिसऱ्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट, चौथ्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट, चौथ्या आठवड्यातल्या रविवारी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट, चौथ्या आठवड्यातल्या रविवारी 10 कोटींहून अधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट, चौथ्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट, पाचव्या आठवड्यातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट, पाच आठवड्यांत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट, दिल्ली शहरातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट, महिन्या भरात इतके रेकॉर्ड्स चित्रपटाच्या नावावर झालेले आहेत.
‘जवान’चे एकूण कलेक्शन अजूनही ‘स्त्री 2’ पेक्षा जास्त आहे. सॅकनिल्कच्या मते, ‘स्त्री 2’ ने जगभरात 798.7 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर ‘जवान’चे लाइफटाईम वर्ल्डवाइड कलेक्शन 1,160 कोटी रुपये आहे. ‘जवान’ने केवळ विदेशी बाजारातून 400 कोटींची कमाई केली होती. तर ‘स्त्री 2’ ने विदेशी बाजारातून केवळ 130 कोटींची कमाई केली आहे.विशेष म्हणजे, चित्रपट रिलीज होऊन एक महिना झाला असला तरीही चित्रपटाच्या लोकप्रियतेत काहीच फरक पडत नाहीये.
दरम्यान, चित्रपटाचा बजेट ५० कोटींच्या आसपासचा आहे. चित्रपटाने देशात ५८६ कोटींची कमाई केलेली आहे. तर जगभरात चित्रपटाने ८२६ कोटींची कमाई केलेली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिकने केले असून श्रद्धा कपूर, राजकुमार राव आणि पंकज त्रिपाठी प्रमुख भूमिकेत आहेत. तर, वरुण धवन, अक्षय कुमार आणि तमन्ना भाटियाने चित्रपटामध्ये कॅमियो रोल साकारला आहे.