'स्त्री २'ने थेट किंग खानच्या 'जवान'लाही टाकलं मागे, असा कोणता रेकॉर्ड मोडला?
Stree 2 Becomes ‘Highest Grossing’ Hindi Film Ever In India : श्रद्धा कपूर, राजकुमार राव आणि पंकज त्रिपाठी स्टारर ‘स्त्री २’ चित्रपट १५ ऑगस्टला रिलीज झाला आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर महिन्याभरातच या चित्रपटाने भारतात शिवाय परदेशातही धमाकेदार कमाई करत स्वत:च्या नावावर नवीन इतिहास रचला आहे. अमर कौशिक दिग्दर्शित ‘स्त्री २’ चित्रपटाचा हिंदीमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये समावेश झाला आहे. या हॉरर कॉमेडी चित्रपटाने शाहरूख खानच्या ‘जवान’ चित्रपटालाही सर्वाधिक कमाई करत मागे टाकलं आहे.
हे देखील वाचा – Bigg Boss 18 साठी १४ स्पर्धक सज्ज, कोणाला दाखवणार सलमान खान भविष्य?
या संबंधितची माहिती चित्रपट समीक्षक आणि फिल्म ट्रेड ॲनालिस्ट तरण आदर्श यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. दरम्यान, श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या चित्रपटाने पाचव्या आठवड्यात शुक्रवारी ३.६० कोटी, शनिवारी ५.५५ कोटी, रविवारी ६.८५ कोटी, सोमवारी ३.१७ कोटी तर मंगळवारी २.६५ कोटींची कमाई चित्रपटाने केली आहे. अशाप्रकारे चित्रपटाने देशभरात ५८६ कोटींची कमाई केलेली आहे. तर ‘जवान’ चित्रपटाने हिंदी भाषेत एकूण ५८२ कोटींची कमाई केलेली आहे. अशा पद्धतीने ‘स्त्री २’ने ‘जवान’ला मागे टाकलं आहे.
हे देखील वाचा – ॲमेझॉन एमएक्स प्लेयरने ‘इश्क इन द एअर’ सिरींजचा ट्रेलर केला प्रदर्शित!
‘स्त्री २’ चित्रपटाने पुन्हा एकदा आपल्या नावावर हा अनोखा विक्रम रचला आहे. विशेष म्हणजे, चित्रपट रिलीज होऊन एक महिना झाला असला तरीही चित्रपटाच्या लोकप्रियतेत काहीच फरक पडत नाहीये. दरम्यान, चित्रपटाचा बजेट ५० कोटींच्या आसपासचा आहे. चित्रपटाने देशात ५८६ कोटींची कमाई केलेली आहे. तर जगभरात चित्रपटाने ८२६ कोटींची कमाई केलेली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिकने केले असून श्रद्धा कपूर, राजकुमार राव आणि पंकज त्रिपाठी प्रमुख भूमिकेत आहेत. तर, वरुण धवन, अक्षय कुमार आणि तमन्ना भाटियाने चित्रपटामध्ये कॅमियो रोल साकारला आहे.