
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दृष्टी, नवे तत्त्वज्ञान आणि नवी सौंदर्यभाषा देणारे शांताराम राजाराम वणकुद्रे म्हणजेच व्ही. शांताराम. या महापुरुषाचे असामान्य, प्रेरणादायी आणि वैभवशाली जीवन आता पहिल्यांदाच एका भव्यदिव्य चित्रपटाच्या महाकाव्यातून उलगडणार आहे. स्टुडिओतील साध्या कामगारापासून जागतिक दर्जाची कलाकृती निर्माण करणाऱ्या दिग्दर्शकापर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे धडपड, प्रयोगशीलता, कामाप्रती असलेली निष्ठा आणि कलाप्रेम यांचा दिव्य संगम यात अनुभवायला मिळणार आहे.
‘व्ही. शांताराम’ या चित्रपटाद्वारे आता त्यांचे असामान्य, प्रेरणादायी आणि वैभवशाली जीवन एका मेगा बायोपिकच्या रूपात मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. जे व्हिज्युअली ग्रँड, इमोशनली पॉवरफुल आणि सिनेमॅटिकली आयकॉनिक असणार आहे. ‘व्ही. शांताराम’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटात बॉलीवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी व्ही. शांताराम यांच्या भूमिकेत चमकणार आहे. जो खरोखरच एक गेमचेंजर अनुभव ठरणार आहे.
अखेर सामंथाने नव्याने थाटला संसार! दिग्दर्शक राज निदिमोरूशी केले लग्न; लग्नाच्या PHOTO ने वेधले लक्ष
पहिले पोस्टर प्रदर्शित रिलीज
चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये, सिद्धांत चतुर्वेदी धोतर, कुर्ता, कोट आणि टोपीमध्ये स्टायलिश पोज देताना दिसत आहे. सिद्धांतच्या मागे गरुड आणि मोकळे आकाश दिसत आहे. निर्मात्यांनी पोस्टरला कॅप्शन दिले आहे, “भारतीय चित्रपटाची पुनर्परिभाषा करणारा बंडखोर मोठ्या पडद्यावर परतला आहे.” सिद्धांतच्या चाहत्यांनी चित्रपटाच्या पोस्टरबद्दल त्यांचे मत शेअर केले आहे. एका चाहत्याने लिहिले आहे, “मला आधीच विश्वास आहे की तुम्ही यामध्येही चांगले काम कराल. शुभेच्छा.” दुसऱ्याने लिहिले आहे, “सिद्धांत भाऊ, तुम्ही अद्भुत दिसता.” असे लिहून अनेक चाहत्यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत.
काय आहे चित्रपटाची कथा?
हा चित्रपट व्ही. शांताराम यांचा बायोपिक आहे. सिद्धांत चतुर्वेदी यात मुख्य भूमिका साकारणार आहेत हा चित्रपट अभिजीत शिरीष देशपांडे यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे. राहुल किरण शांताराम, सुभाष काळे आणि सरिता अश्विन वर्दे यांनी त्याची निर्मिती केली आहे. हा चित्रपट व्ही. शांताराम यांच्या जीवनावर आणि अविश्वसनीय कार्यावर आधारित असेल. तमन्ना भाटिया आणि फरदीन खान सारखे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार असल्याची शक्यता आहे.
Border 2: दिलजीत दोसांझचा ‘फर्स्ट लुक’ रिलीज ; पायलट, जेट आणि युद्धाचा थरकाप अनुभव!
व्ही. शांताराम कोण होते?
शांताराम राजाराम वनकुद्रे यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९०१ रोजी झाला. व्ही. शांताराम, शांताराम यांना बापू म्हणून ओळखले जात असत. ते भारतीय चित्रपट निर्माता, चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते होते. त्यांनी “अमर भूपली,” “झनक झनक पायल बाजे,” “दो आँखे बारह हाथ,” “नवरंग,” “दुनिया ना माने,” आणि “पिंजरा” सारख्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. १९२७ मध्ये त्यांनी ‘नेताजी पालकर’ हा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.