सिद्धार्थ आनंद एका आगामी प्रोजेक्टसाठी 17 वर्षानंतर सैफ अली खानसोबत पुन्हा एकत्र येत आहे. सैफ अली खानला त्याचा “पहिला नायक” म्हणत ‘फाइटर’ दिग्दर्शकाने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर बुडापेस्टमधून त्याच्यासोबतचे फोटो शेअर केला आहे आणि हे कारण देखील तितकच खास असून ते दोघे पुन्हा एकदा एका प्रोजेक्टसाठी एकत्र आले आहेत. आगामी चित्रपटाच्या नावाचा उल्लेख नसला तरी हे दोघे ‘ज्वेल थीफ’साठी एकत्र काम करत असल्याची चर्चा होत आहे.
याआधी सिद्धार्थ आनंद आणि सैफ अली खान यांनी ‘सलाम नमस्ते’ आणि ‘ता रा रम पम’ मध्ये एकत्र काम केले होते जो चित्रपट आजही प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहेत. सिद्धार्थ आनंद आणि सैफ आली खान पुन्हा एकदा एकत्र येत असल्याने आता हे दोघं काय नवीन घेऊन येणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.
दरम्यान, सैफ अली खान शेवटचा आदिपुरुष या चित्रपटामध्ये दिसला होता. या चित्रपटात प्रभास आणि क्रिती सेनन यांच्याही भूमिका होत्या. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झाला. तसेच सिद्धार्थ आनंदच्या नुकत्याच आलेल्या फायटर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटात हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, ऋषभ साहनी, अक्षय ओबेरॉय, संजीदा शेख आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शमशेर पठानियाचे आयुष्यभराचे स्वप्न पूर्ण करून भारतीय वायुसेनेचा सदस्य बनण्याची कथा या चित्रपटात आहे.
[read_also content=”नर्गिस फाखरी यांनी संदीप रेड्डी वंगासोबत काम करण्याबद्दल केला मोठा खुलासा ! https://www.navarashtra.com/entertainment/nargis-fakhri-wants-to-work-with-sandeep-reddy-539091/”]
तसेच सैफ आणि सिद्धार्थ आनंद हे Marflix Pictures सोबत एका नवीन प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार आहे. ॲक्शन असलेला हा हिस्ट ड्रामा डायरेक्ट-टू-डिजिटल रिलीज होणार असल्याचे समजले आहे. हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येऊन त्याला भरपूर प्रतिसाद मिळेल यात शंकाच नाही.