Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“तू लढ! बाकी तेरा आदमी…”; सिद्धार्थ चांदेकरची पत्नीसाठी खास पोस्ट, हेमंत ढोमेच्या कमेंटने वेधलं लक्ष

'फसक्लास दाभाडे'च्या निमित्ताने सिद्धार्थ-मिताली दोघंही पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. सिद्धार्थ-मितालीच्या लग्नाच्या वाढदिवशीच पहिला- वहिला एकत्र असलेला चित्रपट त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशी रिलीज झाला.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 24, 2025 | 03:11 PM
"तू लढ! बाकी तेरा आदमी..."; सिद्धार्थ चांदेकरची पत्नीसाठी खास पोस्ट, हेमंत ढोमेच्या कमेंटने वेधलं लक्ष

"तू लढ! बाकी तेरा आदमी..."; सिद्धार्थ चांदेकरची पत्नीसाठी खास पोस्ट, हेमंत ढोमेच्या कमेंटने वेधलं लक्ष

Follow Us
Close
Follow Us:

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत सिद्धार्थ चांदेकर, मिताली मयेकर, क्षिती जोग आणि अमेय वाघसह अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. कायमच आापल्या लव्हस्टोरीमुळे आणि अभिनयामुळे चर्चेत राहणारे सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर त्यांच्या अपकमिंग चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाच्या निमित्ताने हे दोघंही पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. चित्रपटाची जोरदार चर्चा होत असताना, सिद्धार्थ-मितालीच्या लग्नाच्या वाढदिवशीच पहिला- वहिला एकत्र असलेला ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपट त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशीच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे या जोडप्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

सयाजी शिंदे २२ वर्षांनी पुन्हा एकदा गाजवणार मराठी रंगभूमी, नवं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

काही तासांपूर्वीच लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सिद्धार्थ चांदेकरने मितालीसाठी इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेता म्हणतो, “बायको! आज आपल्या लग्नाच्या वाढदिवशी आपल्या दोघांचा पहिला सिनेमा रिलीज होतोय. किती भारी! मी कायम तुझी अभिनय करण्याची भूक, धडपड आणि तडफड पाहत आलोय. मला कायमच तुझा अभिमान होता, पण तुझं हे काम बघून तर मला जरा जास्तच अभिमान वाटतोय. तू एक सुंदर अभिनेत्री आहेस, आणि तू आईशप्पथ कडक काम केलयस. तुझ्याकडे इतकं यश येवो, इतकं ऐश्वर्य येवो, की तुला मागे वळून बघायची गरजच भासणार नाही. मी नेहमीसारखा खंबीरपणे तुझ्या मागे उभा आहे. तू लढ! बाकी तेरा आदमी देख लेगा! Happy Anniversary!- नवरा”

 

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध सेलिब्रिटींपैकी एक आहे. या दोघांनीही आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मोठ्या प्रमाणावर चाहतावर्ग निर्माण केला आहे. सिद्धार्थ-मितालीने एकमेकांना अनेक वर्षे डेट केल्यावर २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. ही रोमँटिक जोडी ऑनस्क्रीन एकत्र केव्हा झळकणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर या नव्या वर्षात दोघेही ‘फसक्लास दाभाडे’चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या चित्रपटाचे सध्या प्रेक्षक जोरदार कौतुक करीत आहेत.

नात्यांच्या धाग्याने गुंफलेली चंद्रपूरच्या जंगलातील रहस्यमयी गोष्ट! ‘स ला ते स ला ना ते’चा अफलातून ट्रेलर रिलीज

सिद्धार्थने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. सिद्धार्थ आणि मितालीच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमेने “पप्पू – माधुरीला लय लय पप्प्यााााा!!!” अशी खास कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्याने शेअर केलेल्या पोस्टवर दिग्दर्शक हेमंत ढोमे, क्षिती जोग, आदर्श शिंदे, अभिषेक देशमुख, आनंदी जोशी, गायत्री दातार यांसह सिद्धार्थ-मितालीच्या चाहत्यांनीही अभिनेत्याच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

Web Title: Siddharth chandekar writes special post for wife mitali on the occasion of wedding anniversary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2025 | 03:11 PM

Topics:  

  • marathi film

संबंधित बातम्या

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा
1

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा

‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटातून उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट, चित्रपटाचा टीझर लाँच!
2

‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटातून उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट, चित्रपटाचा टीझर लाँच!

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन, मोठमोठ्या तारकांची लागणार हजेरी!
3

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन, मोठमोठ्या तारकांची लागणार हजेरी!

साई बाबांचं दर्शन घेत ‘येरे येरे पैसा ३’च्या टीमने ‘आली रे आली गुलाबाची कळी’ गाणं केलं प्रदर्शित
4

साई बाबांचं दर्शन घेत ‘येरे येरे पैसा ३’च्या टीमने ‘आली रे आली गुलाबाची कळी’ गाणं केलं प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.