Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Miranda Warning Trailer Released: मराठी सिनेसृष्टीत रहस्याचा थरार! ‘मिरांडा वॉर्निंग’चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज

Miranda Warning Trailer Released: मराठी चित्रपटसृष्टीत ‘मिरांडा वॉर्निंग’ या नव्या सस्पेन्स क्राईम थ्रिलर चित्रपटाची एन्ट्री झाली आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, हत्या, पोलिस तपास, संशय आणि मानवी नात्यांमधील गुंतागुंत यांची झलक पाहायला मिळते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 14, 2026 | 11:55 AM
Miranda Warning Trailer Released: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Miranda Warning Trailer Released: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘मिरांडा वॉर्निंग’चा सस्पेन्सफुल ट्रेलर प्रदर्शित.
  • हत्या, पोलिस तपास आणि रहस्याभोवती फिरणार कथानक.
  • चित्रपट 27 नोव्हेंबर 2026 रोजी प्रदर्शित होणार.

चित्रपट पाहताना प्रत्येक दृश्यात पुढे काय घडणार, कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं, गुन्हेगार नेमका कोण, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात प्रेक्षकांना जी मजा मिळते, तोच अनुभव देण्यासाठी आता मराठी चित्रपटसृष्टीत ‘मिरांडा वॉर्निंग’ हा नवा सस्पेन्स क्राईम थ्रिलर दाखल होत आहे. या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यातील रहस्यमय वातावरण आणि गुंतागुंतीच्या कथानकाने चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण केली आहे. Miranda Warning Trailer Released:

एक वेगळा सिनेमॅटिक अनुभव

सस्पेन्स आणि क्राईम थ्रिलर हा चित्रपटप्रकार प्रेक्षकांना नेहमीच आकर्षित करत आला आहे. मात्र एखाद्या गुन्ह्याची कथा सांगताना त्यामागील मानसिकता, मानवी नाती, संशय आणि सत्याचे वेगवेगळे पैलू उलगडणे हेच अशा चित्रपटाचे खरे वैशिष्ट्य असते. ‘मिरांडा वॉर्निंग’ याच धाटणीचा एक वेगळा सिनेमॅटिक अनुभव घेऊन येत आहे.

‘मिरांडा वॉर्निंग’ या चित्रपटातून वेगळा प्रयोग

सतनाम फिल्म्स स्टुडिओ आणि ओपन गेट मुव्हीज मार्फत “मिरांडा वॉर्निंग” या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. सचिन धोत्रे यांनी चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे तर अल्ट्रा मीडिया एंटरटेनमेंटच्या सुशीलकुमार अग्रवाल आणि सुकल्प चित्रच्या कल्पक जोशी यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. सचिन धोत्रे यांनी चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. त्यांनी या पूर्वी २०२३मध्ये ‘गेट-टुगेदर’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यानंतर ‘मिरांडा वॉर्निंग’ या चित्रपटातून त्यांनी वेगळा प्रयोग केला आहे. रवींद्र मठाधिकारी, सायली मठाधिकारी यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. अभिनेता आदिनाथ कोठारे, जान्हवी किल्लेकर, पायल जाधव, सुरेश विश्वकर्मा, वैभव चव्हाण, इरिना राय, एकनाथ गीते, त्रिशा, निलेश गवारे, इम्रान तांबोळी या कलाकारांचा दमदार अभिनय आपल्याला या चित्रपटातून पहायला मिळणार आहे.

नेमके सत्य काय?

चित्रपटाची कथा एका रिसॉर्टमध्ये घडणाऱ्या रहस्यमय घटनेभोवती फिरते. दोन जोडपी, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गुंतागुंत, अचानक घडलेली हत्या आणि त्यानंतर सुरू होणारा पोलिस तपास… या सगळ्या घटनांमधून संशयाचे जाळे अधिकाधिक घट्ट होत जाते. प्रत्येक पात्राची एक वेगळी बाजू समोर येते. प्रत्येकाच्या बोलण्यात काहीतरी लपलेले असल्याची जाणीव होते. त्यामुळे नेमके सत्य काय आणि या प्रकरणामागील खरा चेहरा कोणता, याचा शोध घेणे हेच या चित्रपटाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. या तपासाची जबाबदारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्तक यांच्यावर आहे. आपल्या अनुभवातून गुन्ह्यांची उकल करणाऱ्या या अधिकाऱ्यासमोर मात्र हे प्रकरण अनेक प्रश्न उभे करते. पुरावे, जबाब आणि घटनाक्रम यांची सांगड घालत सत्यापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

एखाद्या घटनेकडे केवळ कायद्याच्या चौकटीतून पाहायचे

विशेष म्हणजे, ‘मिरांडा वॉर्निंग’ केवळ खुनी कोण आहे याभोवती फिरत नाही, तर कायद्याची प्रक्रिया आणि प्रत्यक्ष न्याय यातील फरक अधोरेखित करणारा विचारही मांडतो. एखाद्या घटनेकडे केवळ कायद्याच्या चौकटीतून पाहायचे की त्यामागील परिस्थिती आणि वास्तव समजून घ्यायचे, असा महत्त्वपूर्ण प्रश्न हा चित्रपट प्रेक्षकांसमोर ठेवतो.

कथानकाची केवळ एक झलक

ट्रेलरमधून चित्रपटाच्या कथानकाची केवळ एक झलक समोर आली असली, तरी संपूर्ण रहस्य जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपटगृहात जावे लागणार आहे. विशेषतः सस्पेन्स क्राईम थ्रिलर आवडणाऱ्या आणि चित्रपट पाहताना स्वतःच गुन्हेगाराचा अंदाज बांधणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘मिरांडा वॉर्निंग’ हा एक उत्सुकतापूर्ण पर्याय ठरणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांची निर्मिती होत असताना, सस्पेन्स आणि क्राईमच्या माध्यमातून वेगळा आशय मांडणारा हा चित्रपट २७ नोव्हेंबर २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ‘मिरांडा वॉर्निंग’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे का?

    Ans: होय, ‘मिरांडा वॉर्निंग’चा बहुप्रतीक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

  • Que: ‘मिरांडा वॉर्निंग’ चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे?

    Ans: हा चित्रपट 27 नोव्हेंबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.

  • Que: ‘मिरांडा वॉर्निंग’मध्ये कोणते कलाकार आहेत?

    Ans: आदिनाथ कोठारे, जान्हवी किल्लेकर, पायल जाधव, सुरेश विश्वकर्मा, वैभव चव्हाण यांच्यासह अनेक कलाकार आहेत.

Web Title: Miranda warning marathi movie trailer release date cast story rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 11:55 AM

Topics:  

  • adinath kothare
  • Janhvi Killekar
  • marathi cinema
  • marathi film

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.