Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sidhu Moose Wala LIVE: सिद्धू मूसेवालाचा लाईव्ह होलोग्राम कॉन्सर्ट; जाणून घ्या हे तंत्रज्ञान कसं काम करते

सिद्धू मूसेवालाच्या निधनानंतर पहिल्यांदाच होलोग्राम-आधारित जागतिक दौऱ्यावर निघत आहेत. 'साईन्ड टू गॉड वर्ल्ड टूर'च्या टीझरने इंटरनेटवर आधीच धुमाकूळ घातला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 20, 2026 | 05:23 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धू मूसेवालाच्या चाहत्यांसाठी मोठी खुशखबरी आहे. मृत्यूनंतरही त्याची परफॉर्मन्स स्टेजवर पाहता येणार आहे, आणि यासाठी होलोग्राम तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. त्याच्या निधनानंतर पहिल्यांदाच होलोग्राम-आधारित जागतिक दौऱ्यावर निघत आहेत. ‘साईन्ड टू गॉड वर्ल्ड टूर’च्या टीझरने इंटरनेटवर आधीच धुमाकूळ घातला आहे.

सिद्धू मुसेवाला याचे २०२२ मध्ये निधन झाले. आता होलोग्राम तंत्रज्ञानाचा वापर करून त्याच्या मंचावरील उपस्थितीची पुनर्रचना केली जाईल. या तंत्रज्ञानामुळे चाहत्यांना असा अनुभव येईल की, सिद्धू मुसेवाला मंचावर प्रत्यक्ष सादरीकरण करत आहेत.

होलोग्राम तंत्रज्ञानाचा वापर करून थेट संगीत कार्यक्रम आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, टुपॅक शकूर, व्हिटनी ह्यूस्टन, मायकल जॅक्सन, रॉय ऑर्बिसन आणि फ्रँक झप्पा यांच्यासह अनेक कलाकारांची सादरीकरणे होलोग्राम तंत्रज्ञानाचा वापर करून दाखवण्यात आली आहेत.

कलाकाराची जीवंत आकाराची ३डी प्रतिमा तयार करण्यासाठी संग्रहित फुटेज, सीजीआय, मोशन कॅप्चर आणि क्लासिक पेपर्स घोस्ट इल्युजन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. सुधारित प्रकाशयोजना, सिंक्रोनाइझ्ड इफेक्ट्स आणि स्पॅशियल ऑडिओमुळे मैफिलीसारखा अनुभव निर्माण होतो.

होलोग्राम तंत्रज्ञान म्हणजे काय?

होलोग्राम तंत्रज्ञान म्हणजे एका थ्री-डी प्रतिमेला ठराविक प्रोजेक्शनच्या माध्यमातून प्रत्यक्ष स्टेजवर दिसवणे. या प्रक्रियेत गायकाच्या मूव्हमेंट्स, आवाज आणि अभिव्यक्तींचे डिजिटल मॉडेल तयार केले जाते, जे प्रेक्षकांसमोर जिवंत दिसते. या तंत्रज्ञानामुळे गायक प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही स्टेजवर जिवंत असल्याचा अनुभव प्रेक्षकांना मिळतो.

याअंतर्गत सिद्धू मूसेवालाच्या पारंपरिक रेकॉर्डिंग्ज, व्हिडिओ क्लिप्स आणि आवाजाची डिजिटल रचना करून स्टेजवर त्याची परफॉर्मन्स साकारली जात आहे. या अनोख्या तंत्रज्ञानामुळे चाहत्यांना त्यांच्या आवडत्या कलाकाराचा अनुभव प्रत्यक्ष भेटल्यासारखा मिळणार आहे.

होलोग्राम वापरून एखादी वस्तू अशा प्रकारे तयार केली जाते:

होलोग्राम तंत्रज्ञान लेझर बीम प्रकाशाचा वापर करते.

लेझर प्रकाश दोन भागांमध्ये विभागला जातो.

पहिला भाग म्हणजे संदर्भ बीम

दुसरा भाग म्हणजे ऑब्जेक्ट बीम

दोन्ही बीम एकत्र येऊन एक नमुना (pattern) तयार करतात.

हा नमुना रेकॉर्ड केला जातो आणि त्याला होलोग्राम म्हणतात.

कॉन्सर्ट दरम्यान हा नमुना प्रत्यक्षपणे पुन्हा तयार केला जातो.

मानवी डोळ्यांसमोर एक 3D मॉडेल तयार केले जाते.

सिद्धू मुसेवाला याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक टीझर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये जागतिक दौऱ्याची माहिती देण्यात आली असून, त्यात सिद्धू मुसेवाला याचा समावेश आहे. तसेच, हा जागतिक दौरा भारत, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युके आणि पाकिस्तानसह आठ देशांमध्ये होणार असल्याचेही त्यात नमूद केले आहे. या उद्देशासाठी एक अधिकृत पोर्टलदेखील तयार करण्यात आले आहे. वेबसाइटवर असे म्हटले आहे की, चाहते एका 3D शोद्वारे त्याचा आवाज, ऊर्जा आणि उपस्थिती अनुभवू शकतील.

मुसेवाला याचा मृत्यू चर्चेत

२९ मे २०२२ रोजी पंजाबमध्ये सिद्धू मुसेवाला याची हत्या झाली. या प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली होती. त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या गाण्यांची लोकप्रियता कायम आहे. हा दौरा तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचे उत्तम उदाहरण आहे. तसेच, जगभरातील चाहत्यांसाठी त्याचा आवाज, ओळख आणि प्रभाव जिवंत ठेवण्याचा हा एक प्रयत्न आहे.

Web Title: Sidhu moose wala hologram live concert know how this technology works

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 05:23 PM

Topics:  

  • Famous Singer
  • Indian Music
  • Siddhu Musewala

संबंधित बातम्या

‘माझं शरीर, माझा हक्क… त्याचे डोळे, त्याचा हक्क’, प्रसिद्ध गायिकेचं वक्तव्य चर्चेत; ट्रोलिंगनंतर दिलं स्पष्टीकरण
1

‘माझं शरीर, माझा हक्क… त्याचे डोळे, त्याचा हक्क’, प्रसिद्ध गायिकेचं वक्तव्य चर्चेत; ट्रोलिंगनंतर दिलं स्पष्टीकरण

Guru Randhawa Gym Firing Case: गोळीबार करणारे बिश्नोई गँगचे आरोपी एन्काऊंटरमध्ये जखमी; दोघेही पोलिसांच्या ताब्यात
2

Guru Randhawa Gym Firing Case: गोळीबार करणारे बिश्नोई गँगचे आरोपी एन्काऊंटरमध्ये जखमी; दोघेही पोलिसांच्या ताब्यात

Padma Awards 2026: अलका याज्ञिक यांना पद्मभूषण, पण प्रकृतीने वेधलं लक्ष; सहकाऱ्यांच्या मदतीने पोहोचल्या व्यासपीठावर
3

Padma Awards 2026: अलका याज्ञिक यांना पद्मभूषण, पण प्रकृतीने वेधलं लक्ष; सहकाऱ्यांच्या मदतीने पोहोचल्या व्यासपीठावर

Virat Kohli Favourite Singer And Song: मैदानात उतरण्याआधी विराट कोहली ऐकतो ‘हे’ गाणं; फेव्हरेट पंजाबी सिंगरबद्दल केला खुलासा
4

Virat Kohli Favourite Singer And Song: मैदानात उतरण्याआधी विराट कोहली ऐकतो ‘हे’ गाणं; फेव्हरेट पंजाबी सिंगरबद्दल केला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.