माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत सारा अली खान करणार स्क्रिन शेअर, चित्रपटाची तारीख ठरली; ट्रेलर केव्हा रिलीज होणार?
गेल्या काही दिवसांपूर्वी मेडॉक फिल्म्सने २०२५ सह पुढच्या काही वर्षांचे चित्रपटांची घोषणा केली. आता अशातच या प्रॉडक्शन हाऊसने आपल्या अपकमिंग फिल्मची घोषणा केली आहे. अक्षय कुमार आणि वीर पहारियाचा लवकरच आगामी चित्रपट प्रेक्षकांचा भेटीला येणार आहे. नुकताच प्रेक्षकांचा भेटीला चित्रपटाचा मोशन पोस्टर आला असून काही तासांपूर्वीच निर्मात्यांनी चित्रपटाची घोषणा केली आहे. चित्रपटाचं नाव ‘स्काय फोर्स’ असं असून एअरफोर्सवर आधारित हा चित्रपट आहे.
अक्षय कुमार हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. गेल्यावर्षी तो ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘खेल खेल मैं’ आणि ‘सरफिरा’ सारख्या चित्रपटांतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता या वर्षामधील अभिनेत्याच्या पहिल्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. नवीन वर्षात अक्षयचा कोणता सिनेमा येणार याचं आता चाहत्यांना अखेर उत्तर मिळालं आहे. शेअर केलेल्या पोस्टरमध्ये, अक्षय कुमार आणि वीर पहारिया एअर फोर्स अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. दोघेही पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. दरम्यान, या चित्रपटाच्या माध्यमातूनच वीर पहारिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
तेजस देऊस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’साठी अभिनेता सुबोध भावे ऑनबोर्ड !!
‘स्काय फोर्स’ चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि वीर पहारिया सोबतच सारा अली खान आणि निम्रत कौरही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शेअर केलेल्या पोस्टरमध्ये चित्रपटाच्या ट्रेलरचीही रिलीज डेट जाहीर केली आहे. उद्या म्हणजेच ५ जानेवारीला ‘स्काय फोर्स’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला जाणार आहे. वीर पहारियाचा हा पहिलाच सिनेमा असल्याने चाहत्यांमध्ये त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी कमालीची उत्सुकता आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सारा आणि वीरचा एका बौद्ध मंदिरासमोर गढवाली गाण्यावर नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तेव्हापासून दोघांनाही एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे.
१९६५ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान हवाई युद्धादरम्यान पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यावर आधारित चित्रपटाचं कथानक आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाच्या माध्यमातून एक रोमांचकारी कथा बघायला मिळेल यात शंका नाही. ‘स्त्री’ आणि ‘मुंज्या’ या हॉरर युनिव्हर्स चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या दिनेश विजन आणि मॅडॉक फिल्मसने चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप केवलन आणि अभिषेक अनिल कपूरने केलेलं आहे. तर चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन, ज्योती देशपांडे आणि अमर कौशिकने केली आहे. दिनेश विजन आणि मॅडॉक फिल्मस या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. दरम्यान, ‘स्काय फोर्स’ चित्रपट २४ जानेवारी २०२५ ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.