Bigg Boss 18: न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर करणवीर मेहराची झलक; व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले, "आता विजय निश्चित..."
‘बिग बॉस’चे असंख्य चाहते आहेत. मराठी, हिंदी, तेलुगू, तमिळ आणि कन्नड अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये हा शो प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. ऑक्टोबर २०२३ पासून बिग बॉस हिंदीचा अठरावा सीझन सुरू झाला आहे. अभिनेता सलमान खान याचं सूत्रसंचालन करतोय. दरम्यान, हा शो संपायला आता अवघे काही काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. ग्रँड फिनालेमध्ये प्रेक्षकांना ७ स्पर्धकांमध्ये ट्रॉफीसाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. त्यापूर्वीच एक स्पर्धक जबरदस्त चर्चेत आला आहे. तो स्पर्धक न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकला आहे. न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरवरील त्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Bigg Boss 18 : फिनालेच्या २ आठवडे आधी कशिश कपूरला दाखवला बाहेरचा रस्ता!
न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर झळकणारा स्पर्धक करणवीर मेहरा आहे. तो बिग बॉसच्या घरामध्ये पहिल्या दिवसापासून कमालीचा चर्चेत राहिलेला स्पर्धक आहे. त्याची कायमच सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना पाहायला मिळते. शिवाय, त्याचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावरही चाहतावर्ग आहे. मुख्य गोष्ट म्हणजे, बिग बॉसच्या चाहत्यांमध्येही करणवीर मेहराच बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरणार अशी चर्चा सुरु आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बिग बॉसच्या ट्रॉफीसाठी विवियन, करणवीर आणि अविनाश मिश्रामध्ये जबरदस्त ‘काँटे की टक्कर’ पाहायला मिळेल. आता या दरम्यानच अभिनेता न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकला आहे. ज्याचा व्हिडिओ अभिनेत्याच्या फॅन पेजने त्यांच्या एक्स हँडलवर शेअर केला आहे.
Seeing Karanveer Mehra featured at Times Square today has brought great joy to all his fans, and for me, experiencing and witnessing this moment at that place is even more special and filled with happiness.#KaranVeerOnTimeSquare #KaranVeerMehra @KaranVeerMehra pic.twitter.com/IKudFpF5Mo
— *GuRjiT* (@kaurgurjit99) January 4, 2025
करणवीर मेहराच्या फॅनपेजने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, करणवीरचा बिग बॉसमधला प्रवास दाखवला आहे. तो रिलीज झाल्यानंतर करणवीर मेहराच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. या व्हिडिओच्या कमेंटबॉक्समध्ये फॅन्स म्हणतात की, आता शोमधील अभिनेत्याचा विजय जवळपास निश्चित आहे. ग्रँड फिनालेच्या २ आठवडे आधीच कशिश कपूरला बिग बॉसने बाहेरचा रस्ता दाखवला. कशिश कपूरला बाहेर काढल्यानंतर, सध्या शोमध्ये, करणवीर मेहरा, विवियन डिसेना, अविनाश मिश्रा, रजत दलाल, श्रुतिका अर्जुन, चाहत पांडे, चुम दरंग, शिल्पा शिरोडकर आणि ईशा सिंग यांच्यात ट्रॉफीसाठी लढाई पाहायला मिळणार आहे. अशा परिस्थितीत शोमध्ये कोणकोणते स्पर्धक टॉप ५ मध्ये सामील होतात हे पाहणे देखील रंजक ठरणार आहे.