“जीव गुदमरत होता, गाडी कशीबशी…”, मराठी अभिनेत्यानं शेअर केला शिवशाही बसमधल्या 'त्या' धक्कादायक प्रवासाचा अनुभव
‘मन उडू उडू झालं’ आणि ‘मुरांबा’ यांसारख्या प्रसिद्ध टेलिव्हिजन सीरियलमधून लोकप्रिय झालेला अभिनेता ऋतुराज फडकेने सोशल मीडियावर नुकताच प्रवासातील एक भयंकर अनुभव शेअर केला. दापोलीहून ठाण्याला शिवशाही बसने येताना वाटेत एसी बंद पडला, त्यानंतर पनवेलला बसच बंद पडली, असं ऋतुराजने फेसबूक पोस्टच्या माध्यमातून सांगितलं आहे. धक्कादायक म्हणजे, दुपारी तीन वाजेपर्यंत ठाणे डेपोला पोहोचणं अपेक्षित असणारी शिवशाही बस रात्री आठपर्यंत पोहोचलीच नाही, त्यामुळे डेपोतून आपल्याला फोन आला, असंही ऋतुराजने लिहिलं आहे.
प्रवासावेळी आलेला भयावह अनुभव अभिनेत्याने फेसबुकवर पोस्ट शेअर करत केला आहे. दरम्यान, मराठी अभिनेत्याच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत आपलेही अनुभव शेअर केले आहेत. मराठी अभिनेता ऋतुराज फडकेनं फेसबुकवर पोस्ट करत म्हटलंय की,
“आजचा दापोली- ठाणे, शिवशाही बसमधला अनुभव…
बाहेर खूप जास्त ऊन होतं, गरम होत होतं, म्हणून शिवशाही बसचं रिझर्वेशन केलं.. एक ७० km अंतर कापल्यानंतर शिवशाही गाडीचा एसी चालत नव्हता… Ac मुळे कुलिंग होण्या पेक्षा त्यातून गरम वाफा येत होत्या, ड्रायव्हर आणि कंडक्टरला तशी माहिती दिली… ड्रायव्हरने उत्तर दिलं ac असाच असतो इकडे, तेव्हा गाडी रामवाडी बस स्टॉप वर होती… तिथे ड्रायव्हर गाडी दाखवू शकला असता, परंतु तिथून त्याने गाडी नेली आणि प्रायव्हेट धाब्यावरती थांबवली तिथे जेवणासाठी अर्धा तास गाडी थांबली… त्यानंतर तर अजूनच गरम वाफा यायला लागल्या, बस मध्ये म्हातारी माणसं होती, जीव गुदमरत होता, शेवटी गाडी कशीबशी पनवेलला आली पनवेलला स्टॅन्डच्या बाहेरच ती बंद पडली,.. कशी बशी ती स्टँड मध्ये नेली आणि सगळ्यांना उतरायला सांगितलं, मी पनवेल मध्येच उतरून कॅब करून घरी येणार होतो, आणि आलो सुद्धा.. बस अंदाजे दुपारी अडीच पावणेतीन वाजता ठाणा डेपोत पोहोचते, आश्चर्य करणारी गोष्ट अशी मला एक रात्री आठ वाजता फोन आला, तुम्ही विसापूर स्टॉप वर चढलात ना? दापोली ठाणे बस मध्ये होतात ना?? मी म्हटलं हो… डेपोतून समोरच्या व्यक्ती म्हणाला मग बस कुठे आहे बस अजून पर्यंत ठाणा डेपोत आलेली नाहीये… ही दुरवस्था शिवशाही बसची…”
BIGG BOSS OTT 3 विजेती अभिनेत्री देतेय ‘या’ गंभीर आजाराशी झुंज, म्हणाली, “माझ्या शरीरातील पेशी…”