प्राईम व्हिडिओवर इन्व्हेस्टिगेटिव्ह क्राईम थ्रिलर चित्रपटाची घोषणा, केव्हा आणि कुठे रिलीज होणार 'स्टोलन' चित्रपट ?
प्राईम व्हिडिओवर आता प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवाणी अनुभवायला मिळणार आहे. प्रत्येक आठवड्याला वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटाची आणि वेबसीरीजची घोषणा होत असते. आता अशातच आणखी एका चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. किरण तेजपालची दिग्दर्शक म्हणून ही पहिलीच फिल्म असणार आहे. या चित्रपटाचं नाव ‘स्टोलन’ (Stolen) असं असून काही तासांपूर्वीच प्राईम व्हिडिओच्या सोशल मीडिया पेजवरून चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
‘सन मराठी’वर रंगणार महिला स्पेशल कार्यक्रम, ‘सोहळा सख्यांचा’ शोमध्ये हजारो महिलांचा सहभाग
नवा हिंदी ओरिजिनल इन्व्हेस्टिगेटिव्ह क्राईम थ्रिलर चित्रपट ‘स्टोलन’चा एक्सक्लुझिव्ह प्रीमियर होणार आहे. ही करण तेजपाल दिग्दर्शित पहिलीच फीचर फिल्म असून ती जंगल बुक स्टुडिओसाठी गौरव ढिंगरा यांनी निर्मिती केली आहे. ‘स्टोलन’ची कहाणी करण तेजपाल यांनी स्वप्निल सालकार- अगडबम आणि गौरव ढींगरा यांच्यासोबत लिहिली आहे. हा चित्रपट येत्या ४ जूनला रिलीज होणार आहे. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत, अभिषेक बॅनर्जी, हरीश खन्ना, मिया मेल्जर, साहिदुर रहमान आणि शुभम वर्धन हे कलाकार आहेत.
‘ती’च्या आत्मसन्मानाची कथा सांगणाऱ्या “वामा- लढाई सन्मानाची” चित्रपटाला दमदार प्रतिसाद
चित्रपटाच्या कथानकाबद्दल सांगायचे तर, चित्रपटामध्ये दोन आधुनिक विचारांचे भाऊ असतात. ग्रामीण भागामध्ये असलेल्या एका रेल्वे स्थानकावर एका गरीब महिलेच्या लहान मुलांचं अपहरण होताना ते पाहतात. नैतिक जबाबदारीने प्रेरित होऊन, एक भाऊ दुसऱ्याला त्या आईची मदत करण्यासाठी आणि त्या मुलाला शोधण्याच्या धोकादायक मोहिमेत सामील होण्यास तयार करतो, अशी चित्रपटाची स्टोरी आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर ‘स्त्री २’ फेम अभिषेक बॅनर्जी आहे. अभिषेक बॅनर्जी आणि शुभम वर्धानने भावांची भूमिका साकारलीये.
इन्व्हेस्टिगेटिव्ह क्राईम थ्रिलर ‘स्टोलन’ चित्रपट भारतासह २४० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये ४ जून रोजी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. ‘स्टोलन’ने आपली दमदार सुरुवात व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये केली, जिथे त्याला स्टँडिंग ओव्हेशन मिळालं. त्यानंतर चित्रपटाने बीजिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफी आणि अभिनेत्रीचे पुरस्कार पटकावले. जपानमधील स्किप सिटी इंटरनॅशनल डी-सिनेमा फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शकाचे पुरस्कार मिळाले. झ्युरिच फिल्म फेस्टिव्हल कडून विशेष उल्लेख मिळाला. भारतात याचे प्रीमियर जिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाले आणि त्यानंतर २८ व्या केरळ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील चित्रपट सादर करण्यात आला.