Wama Ladhai Sanmanachi Movie Released On Theater
आपला समाज आजही पुरुषप्रधान समाज आहे. आपण स्त्री-पुरुष समानते विषयी बोलतो पण प्रत्यक्षात तसे वागत नाही. एक स्त्री, मग ती आपली आई, बहीण किंवा बायको असो, आपण तिला योग्य मान देण्यात कमी पडतो. स्त्रिया हा त्रास सहन करतात, पुरुषांना समजून घेतात आणि त्यांचा अपमान होणार नाही अश्या पद्धतीने वागतात….. पण ह्या बदल्यात त्यांना काय मिळतं …. ? कोणी एकीने आवाज उठवला तर समाजाच्या नजरा तिच्याकडे वक्र होतात. बरेच वेळा अशी परिस्थिती उद्भवते कि स्त्री ला स्त्रीच साथ देत नाही. अश्या परिस्थितीत घुसमट सहन करण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नसतो.
“वामा-लढाई सन्मानाची” अश्याच एका स्त्रीची कथा आहे जिथे सरला नावाची मुलगी तिचे शिक्षण पूर्ण करता येईल ह्या हमी वर लग्न करते पण प्रत्यक्षात तसे घडत नाही. तिचे शिक्षण तर बंद होतेच पण नवऱ्याच्या पुरुषी अहंकारापायी तिने रंगवलेली सुखी संसाराची स्वप्ने धुळीस मिळतात. घरी सासू आणि नणंद असते पण सरला ला त्यांची साथ अजिबात लाभत नाही कारण त्या हि मूग गिळून गप्प राहत असतात.
सरला रोज होणारा अत्याचार आणि अपमान सहन करते, का त्याच्या विरुद्ध आवाज उठवते आणि यशस्वी होते का तोंडघशी पडते….. हे बघण्यासाठी “वामा- लढाई सन्मानाची” हा चित्रपट बघायला हवा जो २३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्र, गोवा आणि इंदोर येथे प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे. एक विचार करायला लावणारा आणि सोबत मनोरंजन हि देणारा हा चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरला त्यासाठी समस्त प्रेक्षकांचे मनापासून धन्यवाद.
प्रीती झिंटाचं दिलदार मन, सैनिकांच्या विधवा पत्नी आणि मुलींसाठी दान केले ‘इतके’ कोटी
आपल्या उदंड प्रतिसादामुळे “वामा-लढाई सन्मानाची” हा चित्रपट दिमाखात दुसऱ्या आठवड्यात प्रवेश करीत आहे. मराठवाड्यात हा चित्रपट “सुपरहिट” ठरला असून इतरत्र हि त्याच्या बद्दल सकारात्मक चर्चा होत आहे. सध्या गाजत असलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाबद्दल ऐकून दुःख आणि चीड निर्माण होते आहे. “वामा” अश्या विषयांना वाचा फोडणारा आणि समाजाचे डोळे उघडणारा चित्रपट आहे.
चित्रपटात डॉ. महेशकुमार, गणेश दिवेकर, जुई बी, संजीवनी पाटील हे कलावंत आहेत तर सरला च्या मुख्य भूमिकेत कश्मिरा कुलकर्णी हि गुणी अभिनेत्री आहे. तरुणांच्या “दिल की धडकन” असणाऱ्या गौतमी पाटील चे ह्या चित्रपटातील “फायर ब्रिगेड ला बोलवा” हे गीत प्रेक्षकांनी उचलून धरलेलेच आहे.
बाबो… ६ तासांत ५८३ पुरुषांसोबत लैंगिक संबंध; ॲडल्ट स्टारला गाठावं लागलं हॉस्पिटल
सुब्रह्मण्यम के. हे ह्या चित्रपटाचे निर्माते असून अशोक कोंडके ह्यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. तरंग वैद्य ह्यांनी ह्या चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. त्यांनी एक गीत ही लिहिले असून इतर गाणी मंदार चोळकर ह्यांनी लिहिली आहेत. कैलाश खेर ह्यांच्या दमदार आवाजातील शीर्षक गीत प्रेरणादायी आहे. तर वैशाली सामंत आणि कविता राम ह्यांची गाणी लोकप्रिय ठरत आहेत. चित्रपटाचे कर्णमधुर संगीत ह्रिजु रॉय ह्यांचे आहे.
अशोक कोंडके ह्यांच्या मते त्यांनी समाजात घडणाऱ्या ज्वलंत विषयाला वाचा फोडली आहे आणि त्यांचा विश्वास आहे कि समाज मग तो पुरुष असो वा स्त्री, सगळे कथे सोबत “रिलेट” करतील, त्यामुळे तुम्ही जर हा चित्रपट अजून बघितला नसेल तर आत्ताच तिकीट बुक करा आणि आपल्या मित्र परिवारसह आवर्जून बघा.