Bigg Boss 11 Actress Bandgi Kalra Got Robbed Huge Cash And Ornaments
सलमान खानच्या ‘बिग बॉस ११’ या रिॲलिटी शोमधून प्रसिद्धीझोतात आलेल्या अभिनेत्री बंदगी कालराच्या (bandagi kalra) घरात नुकतीच चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बंदगीने तिच्या घरामध्ये चोरी झाल्याची माहिती इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे. कायमच सोशल मीडियावर आपल्या फॅशन सेन्समुळे चर्चेत राहणारी बंदगी सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
प्रीती झिंटाचं दिलदार मन, सैनिकांच्या विधवा पत्नी आणि मुलींसाठी दान केले ‘इतके’ कोटी
चोरीची घटना घडल्याची माहिती बंदगीने स्वतः इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे. बंदगीच्या घरामध्ये चोरट्यांनी तिच्या घरातील दोन्ही दरवाजे तोडलेले होते, याशिवाय चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात रोकड तसेच मौल्यवान वस्तू सुद्धा घरातून लंपास केल्या आहेत. बहिणीच्या लग्नाच्या आधीच ही घटना घडल्यामुळे बंदगीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. तिच्या घरात मोठ्या प्रमाणावर रोकड आणि दागिने ठेवण्यात आले होते, जे चोरीला गेले आहेत. घडलेला सर्व किस्सा बंदगीने इन्स्टा स्टोरी शेअर करत सांगितला आहे.
Bigg Boss 11 Actress Bandgi Kalra Got Robbed Huge Cash And Ornaments
शेअर केलेल्या इन्स्टा स्टोरीमध्ये बंदगी म्हणते, “मला कधीच एवढं असहाय्य वाटलं नाही. घरात चोरी झाली असूनही त्यावर अजूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. आपली व्यवस्था इतकी कमकुवत झाली आहे की लोक अजूनही आरामात आहेत आणि याविषयी काहीच कारवाई करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या कामाच्या नैतिकतेवर आणि प्रामाणिकपणावर मला स्पष्ट शंका आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी जी पावले उचलली जात आहेत, ते स्पष्टपणे दिसून येत आहे.”
बाबो… ६ तासांत ५८३ पुरुषांसोबत लैंगिक संबंध; ॲडल्ट स्टारला गाठावं लागलं हॉस्पिटल
बंदगी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणते, “माझ्या घरातील कॅमेरा आणि एसडी कार्डही चोरीला गेले आहे. दोन दरवाजे तुटलेले आहेत आणि कोणालाही काहीच कळले नाही. मला आपल्या व्यवस्थेबद्दल खूप निराशा आहे, मला नेहमीच ते माहित होते पण आता मला त्याचा सामना करावा लागत आहे आणि मग लोक विचारतात की तुम्ही भारताबाहेर का जाऊ इच्छिता? चोरीची माहिती देऊन जवळजवळ ३० तास झाले आहेत!”
बंदगीच्या घरामध्ये झालेली चोरीची घटना सध्या सोशल मीडियावर कमालीची चर्चेत आहे. चाहत्यांकडून आणि अनेक सेलिब्रिटींकडून बंदगी कालराला धीर देण्याचे प्रयत्न केले जात आहे. सध्या या घटनेचा पोलिस तपास करत आहेत. बंदगीच्या चोरी झालेल्या वस्तू लवकरच सापडतील आणि चोर गजाआड जाईल, अशी तिच्या चाहत्यांना आशा आहे.