फोटो सौजन्य - Social Media
आज सर्वत्र महाराष्ट्रभर बिग बॉस मराठी पर्व पाचवेची चर्चा आहे. या पर्वामध्ये अनेक सेलेब्रिटी मंडळींनी सहभाग घेतला होता. बिग बॉस मराठीच्या या पर्वामध्ये कोण जिंकेल? कोण पटकावणार बिग बॉस मराठी पर्व पाचवेची मानाची ट्रॉफी? या प्रश्नांच्या उत्तरांनी सगळ्यांचे लक्ष वेधले होते. ६ ऑक्टोबर २०२४ रोजी बिग बॉस मराठी पर्व पाचवेचा ग्रँड फिनाले पार पडला. सगळ्यांना गोळीगत गार करत सुरज चव्हाण यंदाचा बिग बॉस मराठी सीजन ५ चा विजेता ठरला आहे. राज्यभरातून सूरजला खूप प्रेम आणि प्रतिसाद मिळाला. सुरजवरील त्याच्या चाहत्यांच्या या प्रतिसादाने त्याला इथवर आणून सोडले आहे. त्याचे राज्यभरातच नव्हे तर संपूर्ण देशभरात कौतुक केले जात आहे.
दरम्यान, मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग डिरेक्टर केदार शिंदे यांनी महत्वाची घोषणा केली आहे. केदार शिंदे लवकरच बिग बॉस मराठी सीजन पर्व ५ चा विजेता सुरज चव्हाणसोबत एक चित्रपट करणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच या चित्रपटाचे शीर्षक ‘झापुक झुपूक’ असणार असल्याचे केदार शिंदे यांनी जाहीर केले आहे. प्रेक्षकांना केदार शिंदे यांच्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटाची उत्सुकता लागून आहे. तसेच सुरजला मोठ्या पडद्यावर पाहण्यास उत्सुक आहेत.
यंदाचा बिग बॉस सीजन ठरला हटके
बिग बॉस मराठी सीजन ५ इतर मराठी बिग बॉसच्या तुलनेत जरा हटके ठरला आहे. या पर्वाने TRP च्या खेळामध्ये बाजी मारली आहे. सुरज चव्हाण विजेता ठरला असून. गायक अभिजीत सावंत या पर्वातील फर्स्ट रनर अप ठरला आहे. तर अभिनेत्री निक्की तांबोळीने सेकण्ड रनर अप पदी आपले स्थान पटकावले आहे. या पर्वाला फार प्रेम मिळाले असून, यातील स्पर्धकांवर प्रचंड प्रतिक्रिया पाहिल्या गेल्या.