
सुष्मिता सेनने घोषणा केली, ती ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या गौरी सावंतची भूमिका साकारणार आहे. ‘ताली’ची घोषणा करत अभिनेत्रीने या मालिकेचा फर्स्ट लूकही रिलीज केला आहे. या मालिकेचे दिग्दर्शन मराठी चित्रपट निर्माते रवी जाधव करत आहेत.
फर्स्ट लूकसोबतच सुष्मिताने लिहिले की, ‘या सुंदर व्यक्तीचे चित्रण करण्याचा आणि तिची कथा जगासमोर आणण्याचा विशेषाधिकार मिळण्यापेक्षा माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट नाही… त्याबद्दल मी कृतज्ञ आहे!! इथे जीवन आहे आणि प्रत्येकाला ते सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे!!! मी तुमच्यावर प्रेम करते !!! #दुग्गादुग्गा.’
या मालिकेत रवी जाधव भारताची पहिली ट्रान्सजेंडर आई होण्याचा प्रवास तसेच तिच्या कष्टांची माहिती देणार आहे. या मालिकेत सुष्मिता ट्रान्सजेंडर गौरी सावंतची भूमिका साकारताना दिसणार आहे.