ऑस्करवारी करणारा ‘लगान’ ते काळजाला भिडणारा ‘स्वदेस’, मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या 'या' ५ चित्रपटांच्या प्रेमात प्रेक्षक
‘लगान’, ‘स्वदेस’ आणि ‘जोधा अकबर’ यांसारखे एकाहून एक सरस चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा आज वाढदिवस. प्रियांका चोप्रानं निर्मिती केलेल्या ‘व्हेंटिलेटर’ मराठी चित्रपटात त्यांनी अभिनय केला होता. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर हे स्पेशली पीरियड- ड्रामा चित्रपटासाठी ओळखले जातात. आशुतोष अनेकदा प्रेक्षकांच्या भेटीला ऐतिहासिक चित्रपटातून आले आहेत. आपल्या चित्रपटामध्ये ते अनेकदा महागडे सेट बनवल्याचीही चर्चा असते, जेणेकरून ते जुना काळ शक्य तितका जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्रातल्या कोल्हापूरात जन्मलेल्या आशुतोष गोवारीकरांचा जन्म १५ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला आहे.
त्यांची ओळख फक्त आता महाराष्ट्रापुरती किंवा देशापुरती राहिलेली नाही, त्यांची ओळख जगभरामध्ये कायम आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त टॉप हिट आणि अजरामर चित्रपटांवर नजर टाकूया जी तुम्ही OTT वर पहू शकता.
प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा कशी आली? पोस्ट शेअर करत सांगितली जुनी आठवण
जोधा अकबर
एतिहासिक रोमँटिक ड्रामा असलेल्या ‘जोधा अकबर’ चित्रपटात मुघल सम्राट अकबर आणि हिंदू राजकुमारी जोधा यांची लव्हस्टोरी दाखवण्यात आलेली आहे. या पीरीयड- ड्रामा चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय होते. या चित्रपटाच्या दिग्दर्शन आणि निर्मितीची जबाबदारीही आशुतोष गोवारीकर यांच्याकडेच होती. या चित्रपटाला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.
स्वदेश
२००४ मध्ये रिलीज झालेल्या ‘स्वदेश’ चित्रपटात शाहरुख खानने मोहन भार्गवची मुख्य भूमिका साकारली होती. आशुतोष गोवारीकर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखनाची जबाबदारी उत्कृष्ट रित्या सांभाळली होती. चित्रपटात नासामध्ये काम करणाऱ्या एका वैज्ञानिकाची गोष्ट सांगितली आहे जो त्याच्या गावात येऊन वीज करतो. हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्याची मागणीही त्यावेळी करण्यात आली होती.
‘ओ बावरी’ लव्हसाँगने यंदाचा व्हॅलेंटाईन डे होणार अधिकच स्पेशल…
खेलें हम जी जान से
मानिनी चॅटर्जी यांच्या ‘Do And Die: The Chittagong Uprising’ वर आधारित ‘खेले हम जी जान से’ या चित्रपटाला समीक्षकांकडून खूप प्रशंसा मिळाली, परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. अभिषेक बच्चन, दीपिका पदुकोण आणि सिकंदर खेर यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाचे खूप कौतुक झाले.
लगान
आमिर खान आणि ग्रेसी सिंग यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 15 जून 2001 रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत सामील झाला होता. यावेळी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान गोवारीकर यांना स्लिप्ड डिस्कचा त्रास झाला आणि अनेक दिवस त्यांनी बेडवर पडून चित्रपट दिग्दर्शित केला होता. आमिर खानचा ‘लगान’ हा चित्रपट आशुतोष गोवारीकरच्या कारकिर्दीतील एक प्रतिष्ठित चित्रपट आहे. या चित्रपटाला ‘ॲकेडमी अवॉर्ड फॉर बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म’ साठी नामांकन मिळाले आहे.
मोहनजोदड़ो
२०१६ साली रिलीज झालेल्या पीरियड ड्रामा चित्रपटात हृतिक रोशन आणि पूजा हेगडे प्रमुख भूमिकेत होते. चित्रपटाची कथा मोहेंजोदारोच्या प्रेमकथेवर आधारित होतो. या चित्रपटासाठी भव्य सेट उभारण्यात आला होता. तथापि, गोवारीकरच्या इतर चित्रपटांप्रमाणे या चित्रपटाने कमाई केली नाही किंवा समीक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला नाही.