या वर्षाच्या सुरुवातीपासून मनोरंजन सृष्टीत लग्नाचा सिझन सुरू झाला. अनेक सेलेब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकले. नुकतचं अभिनेत्री रकुल प्रित सिंगनं जॅकी भगनानी (Rakul Preeet Singh) सोबत लग्नगाठ बांधली. त्यांच्यानतंर अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu wedding) बो विवाहबंधनात अडकल्याची माहिती समोर येत आली. मात्र, इतर सेलेब्रिटींच्या लग्नाप्रमाणे तापसीने थाटमाटात लग्न न करता अत्यंत साधेपणाने लग्न केल्याची माहती समोर येत आहे. रिपोर्टनुसार, तापसीने बॉयफ्रेंड मॅथियास बोई सोबत 23 मार्च रोजी लग्न केलं आहे. या कपलने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत उदयपूरला लग्नगाठ बांधली.
[read_also content=”रंगाचा बेरंग! धुळवड साजरी करायला गेलेले पाच तरुण माहिमच्या समुद्रात बुडाले, दौघांचा मृत्यू https://www.navarashtra.com/latest-news/5-boys-drowned-sea-near-mahaim-chowpaty-in-mumbai-nrps-517796.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, इतर सेलिब्रिटीप्रमाणे तापसीच्या लग्नात कलाकार मंडळीचा गोतावळा नव्हाता. तापसीनं तिच्या लग्नात कोणत्याही बॉलिवूड अभिनेता-अभिनेत्रीला आमंत्रित केलं नाही. तिचं कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत उदयपूर ती मॅथियाससोबत लग्नगाठ बांधली. तिच्या लग्नात फक्त काही जवळच्या मित्रांनां आमंत्रित करण्यात आलं होत. रिपोर्टनुसार, दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि कनिका ढिल्लों यांनी आमंत्रित केले होते. नुराग कश्यपने तिच्या ‘मनमर्जियां’ आणि ‘दोबारा’ या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे.
मॅथियास बोई हा डेन्मार्कचा रहिवासी आहे. बॅडमिंटनपटू म्हणून तो ऑलिम्पिक पदक विजेता आणि युरोपियन चॅम्पियन आहे. मात्र, 2020 मध्ये तो निवृत्त झाला. बॅडमिंटन विश्वात तापसीच्या बॉयफ्रेंडचं नाव फार मोठं आहे. सोशल मीडियावर मॅथियासचे फोटो देखील व्हायरल होत असतात.
तापसी हिच्या बॉलिवूड करियरबद्दल सांगायचं झालं तर, 2013 पासून तापसी बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. ‘चश्मे बद्दूर’ हा तापसीची पहिला सिनेमा आहे. नुकताच तापसी अभिनेता शाहरुख खान याच्यासोबत ‘डिंकी’ सिनेमात दिलसली होती. सिनेमा 2023 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 450 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली होती.