'तारक मेहता'मधला 'मिस्टर अय्यर' ४४ व्या वर्षीही आहे अविवाहित, अभिनेत्याने खरं कारण सांगत केला खुलासा
सब टिव्हीवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ही लोकप्रिय मालिका म्हणून ओळखली जाते. गेल्या १५ ते १६ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन करीत आहे. मालिकेप्रमाणेच मालिकेतील कलाकारांनाही कमालीची लोकप्रियता मिळाली आहे. मालिकेतील सर्वच कलाकार कमालीचे लोकप्रिय ठरले आहेत. मालिकेमध्ये बबिताच्या पतीची म्हणजेच मिस्टर अय्यरची भूमिका टेलिव्हिजन अभिनेता तनुज महाशब्देने साकारली आहे. मालिकेमध्ये इतकी सुंदर आणि सौंदर्यवती पत्नी मिळालेला मिस्टर अय्यर रियल लाईफमध्ये अजूनही मात्र सिंगल आहे. अभिनेत्याने नुकतीच ई-टाईम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्याने मी रियल लाईफमध्ये पोपटलाल आहे, असं वक्तव्य करत तो अजूनही अविवाहित असल्याचं त्याने सांगितलंय.
खरंतर, रिल लाईफ आणि रियल लाईफ दोन्हीही फार वेगवेगळं असतं. याचाच प्रत्यय आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत मिस्टर अय्यरची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता तनुज महाशब्देसोबत आला आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारा तनुज महाशब्दे सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अभिनेता तनुजा महाशब्देने ई- टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्याने स्वत:ची तुलना मालिकेमध्ये असलेल्या पोपटलालशी केली आहे. मालिकेमध्ये पोपटलालचं अद्यापही लग्न झालेलं नाही. जास्त वय होऊनही अद्याप त्याचं लग्न झालेलं नाही. तो म्हणतो, “मी रिअल लाईफमध्ये पोपटलाल आहे. मालिकेमध्ये मला एक सुंदर पत्नी आहे, पण माझ्या वैयक्तिक आयुष्यात मी अजूनही अविवाहितच आहे. माझं अद्याप लग्न झालेलं नाही. पण, मी सध्या मुलाखतीत बोलत आहे, लवकरच माझ्या रियल लाईफमध्ये काहीतरी सकारात्मक घडेल, अशी आशा आहे.”
११ वर्षात हातावर मोजण्या इतके सुपरहिट चित्रपट; तरीही करोडोंचा मालक, राजेशाही थाटात जगतो टायगर श्रॉफ
कामात व्यस्त असल्यामुळे पर्सनल आयुष्यासाठी वेळ मिळत नाही का? असाही प्रश्न अभिनेत्याला विचारण्यात आला होता. त्या प्रश्नावर अभिनेत्याने “असू शकतं…पण, मला नेमकं कारण माहीत नाही”, असं उत्तर दिलं आहे. तनुज महाशब्देने जेठालालची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता दिलीप जोशीसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. तो म्हणाला की, “जेव्हा हा शो सुरू झाला तेव्हा माझ्यासाठी साऊथ इंडियन कॅरेक्टर साकारणं खूप आव्हानात्मक होते. सुरुवातीला मी ओळी खूप लवकर बोलायचो, पण एकदा दिलीप जोशी यांनी मला या भूमिकेसाठी खूप मदत केली, असित भाईंनीही खूप मदत केली. त्याचा मला इतका फायदा झाला की मी त्या भूमिकेत येऊ लागलो. आता माझी देहबोली आणि संपूर्ण व्यक्तिमत्व साऊथ इंडियन लोकांप्रमाणेच झाले आहे.”
मुलाच्या बर्थ डे पार्टीतून गोविंदा गायब; यशवर्धनने आई आणि बहिणीसोबत कापला केक, VIDEO व्हायरल
४४ वर्षीय अभिनेता तनुज महाशब्देने अद्याप लग्न केलेलं नाही. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील मिस्टर अय्यर आणि बबीताची जोडी लोकप्रिय आहे. या मालिकेत बबिता ही भूमिका अभिनेत्री मुनमुन दत्ता साकारत आहे.