तारक मेहतातल्या भिडे मास्तरच्या लेकीने बांधली लग्नगाठ, Video सोशल मीडियावर व्हायरल…
सध्या सर्वत्र लग्नसराईचा हंगाम सुरू असून अगदी जनसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण लग्नबंधनात अडकत आहेत. अनेक कलाकारांनी २०२४ या वर्षात लग्नगाठ बांधली. आता अशातच आणखी एका प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीने लग्नगाठ बांधली आहे. सोनी सबवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत माधवी भिडे आणि आत्माराम भिडेंच्या लेकीचे पात्र साकारणाऱ्या सोनूने लग्नगाठ बांधली आहे. मालिकेमध्ये आजवर अनेकदा सोनूचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री बदली झाल्या आहेत. मालिकेमध्ये छोट्या सोनूचे पात्र साकारणाऱ्या झील मेहताने लग्नगाठ बांधली आहे.
झीलने वयाच्या २७ व्या वर्षी खऱ्या आयुष्यात विवाहबंधनात अडकली आहे. झील मेहताने तिच्या रियल लाईफमध्ये तिचा लाँगटाइम बॉयफ्रेंड आदित्य दुबेसोबत लग्न केले आहे. झील मेहताने बॉयफ्रेंडसोबत २८ डिसेंबरला लग्नगाठ बांधलीये. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर लग्नातील सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये झील आणि आदित्य यांच्या लग्नातील काही क्षण पाहायला मिळत आहे. हिंदू रितीरिवाजानुसार कपलने लग्नगाठ बांधली आहे. लग्नामध्ये झीलने लाल रंगाचा लेहेंगा निवडला, तर आयव्हरी रंगाच्या शेरवानीमध्ये आदित्य पाहायला मिळत आहे.
“मुशाफिरीनं मागचं वर्ष माझ्यासाठी…” २०२४ वर्षासाठी लिहिलेल्या अभिनेता किरण मानेची पोस्ट चर्चेत
व्हिडीओत झीलची एंट्री पाहायला मिळत असून या जोडप्याचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. झील आणि आदित्य गेल्या १४ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अनेक वर्षे डेट केल्यानंतर आता या कपलने लग्न केलं आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ नंतर झील मेहताने अभिनयाच्या जगापासून अंतर राखलं आहे. ती आता बिझनेसवुमन बनली आहे आणि सोशल मीडियावर ती सक्रिय असून लाइफ अपडेट देत असते. झीलने २००८ मध्ये मालिकेत एन्ट्री घेतली होती. तिने २०१२ मध्ये मालिकेला सोडचिठ्ठी दिली. १० वी ला गेल्यानंतर तिने मालिकेतून ब्रेक घेतला. त्यानंतर तिने कोणत्याही मालिकेत काम केले नाही.
झील तेव्हापासून फिल्म इंडस्ट्रीपासून दूरच आहे. सध्या झील स्टुडंट हाऊसिंग नावाची कंपनी चालवते. ती तिच्या आईसोबत ब्युटी बिझनेसमध्येही काम करते. तर झीलचा पती आदित्य हा गेमिंग इंडस्ट्रीत काम करतो.