(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
‘बडा नाम करेंगे’ ही मालिका लवकरच सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे. OTT वर राजश्री प्रॉडक्शनचा हा डेब्यू शो असणार आहे. ही एक प्रेमकथा मालिका आहे, ज्यामध्ये कौटुंबिक मूल्येही असतील. राजश्री प्रॉडक्शन आणि सूरज बडजात्या यांची ही खासियत आहे. आता लवकरच चित्रपट दिग्दर्शक सूरज बडजात्या ओटीटीवर पदार्पण करणार आहे. या बातमीने चाहत्यांना आनंद झाला आहे. आता ही मालिका लवकरच सोनी लिव्हवर प्रदर्शित होण्यासाठी आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.
एक हृदयस्पर्शी कथा असेल
‘बडा नाम करेंगे’ ही मालिका हृदयस्पर्शी असून तिचे दिग्दर्शन पलाश वासवानी यांनी केले आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या टीझरमध्ये प्रेम आणि कुटुंबाचा समावेश असलेल्या कथेची झलक दाखवण्यात आली आहे. ही मालिका ऋषभ आणि सुरभीची कथा सांगते, ज्यांचे लग्न त्यांच्या भूतकाळातील गोष्टी उघडकीस आल्यावर वेगळे वळण घेते. दोघंही त्यांच्या नात्याबाबत काय निर्णय घेणार याची संपूर्ण कथा या मालिकेमध्ये दाखवण्यात येणार आहे.
सूरज बडजात्या उत्साहित आहेत
‘बडा नाम करेंगे’ या मालिकेबाबत सूरज आर. बडजात्या म्हणाले की, ‘ही मालिका माझ्या हृदयात विशेष स्थान निर्माण करणारी आहे. यासोबत आम्ही नात्यांचे सौंदर्य, प्रेमाची खोली आणि कौटुंबिक मूल्यांची ताकद सांगत आहोत. ही हृदयस्पर्शी कथा प्रेक्षकांसोबत शेअर करताना मी उत्सुक आहे. Sony Liv सह एकत्र येणे हा आमच्यासाठी एक उत्तम अनुभव आहे.’ असे त्यांनी सांगितले. आता त्यांचे हे ओटीटीवरील पदार्पण पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
मालिकेमध्ये हे कलाकार दिसणार
‘बडा नाम करेंगे’ या मालिकेत कंवलजीत सिंग, अलका अमीन, राजेश जैस, चित्राली लोकेश, राजेश तैलंग, अंजना सुखानी आणि अनेक दिग्गज कलाकारांची टीम या मालिकेत दिसणार आहे. हे सर्व कलाकार चित्रपट आणि टीव्हीमधील उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जातात. राजश्री प्रॉडक्शनचे चित्रपट आणि मालिका प्रेक्षकांना याआधीही आवडल्या आहेत, त्यामुळे या मालिकेबद्दलही चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.