तमन्ना भाटिया आणि विजय वर्माचा ब्रेकअप ? लग्नाच्या चर्चांदरम्यानच चाहत्यांना मोठा धक्का
कायमच आपल्या रिलेशनमुळे चर्चेत राहिलेले तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा सध्या त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी लग्नाच्या चर्चांमुळे चर्चेत आलेले तमन्ना आणि विजय सध्या घटस्फोटामुळे चर्चेत आले आहेत. हे कपल गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार त्यांचं आता काही वर्षांचं नातं आता संपुष्टात आलं आहे. २०२३ मध्ये रिलीज झालेल्या ‘लस्ट स्टोरीज २’ चित्रपटापासून विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया चर्चेत आहेत.
लग्नासाठी केलं धर्मांतर, आता ७ वर्षांनी दीपिका आणि शोएब इब्राहिम घेणार घटस्फोट? अभिनेता म्हणाला…
शुटिंगपासून एकमेकांना ओळखत असलेलं हे कपल तेव्हापासून एकमेकांना डेट करत होते. खरंतर, चित्रपटात त्या दोघांचेही इंटिमेट सीन्स होते. नंतर हे कपल खऱ्या आयुष्यातही एकमेकांना डेट करत होते. पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, तमन्ना आणि विजयचा ब्रेकअप झाला आहे. दोघेही कायमच एकमेकांप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करत असतात. त्याच आदराप्रित्यर्थ तमन्ना आणि विजय यांनी यापुढे केवळ चांगले मित्र म्हणून राहण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही आठवड्यांपूर्वीच कपलने ब्रेकअप केला आहे. दोघेही सध्या त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहेत आणि कठोर मेहनतही घेत आहेत. तमन्ना आणि विजयच्या लग्नाच्या सर्वत्र चर्चा सुरु असताना त्यांच्या घटस्फोटाची ही बातमी आल्याने दोघांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
ऋतिक रोशन, फरहान अख्तर आणि अभय देओल पुन्हा एकत्र, नेमकं कारण काय ?
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा ही सध्याची बॉलिवूडमधील आवडती जोडी आहे. दोघेही दीर्घ काळापासून एकमेकांना डेट करत होते. त्यांनी ‘लस्ट स्टोरीज २’मध्ये एकत्र काम केले तेव्हापासून त्या जोडीच्या लव्ह लाइफची चाहत्यांमध्ये चर्चाही रंगली. हे कपल पापाराझींच्या कॅमेऱ्यात अनेकदा स्पॉटही झाले आहेत. तर काहीवेळा त्यांनी स्वत:च सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटोही शेअर केले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्यांच्या लग्नाबद्दलही बोलले गेले. पण आता यादरम्यानच तमन्ना आणि विजय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत. दरम्यान, तमन्ना अलीकडेच प्रयागराजला महाकुंभमेळ्यामध्ये तसेच इतर काही धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी गेली होती. याठिकाणी ती एकटीच गेली होती.
रश्मिका मंदानाच्या समर्थनार्थ कंगना रणौत आली पुढे, कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना दिले चोख उत्तर!
तमन्ना आणि विजयची जोडी ही सोशल मीडियावरील प्रचंड चर्चेत राहिलेली जोडी आहे. अवॉर्ड्स, इव्हेंट्स आणि मूव्ही स्क्रीनिंग्स अशा सगळीकडेच दोघं एकत्र स्पॉट व्हायचे. दोघांनी आपली प्रायव्हसी जपली होती तरी नातं मात्र उघडपणे कबूलही केलं होतं. यावर्षी दोघं लग्न करतील अशाही चर्चाही माध्यमांमध्ये रंगल्या होत्या. आता अचानक त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याने चाहते निराश झाले आहेत. दरम्यान, तमन्ना आणि विजयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, अलीकडेच विजय वर्मा नेटफ्लिक्सवरील ‘IC 814: द कंधार हायजॅक’मध्ये दिसला होता. तर तमन्नाने ‘सिकंदर का मुकद्दर’, ‘वेदा’, ‘स्त्री २’मध्ये अलिकडच्या काळात काम केले आहे.