Shoaib Ibrahim And Dipika Kakar Divorce Rumours After 7 Years Of Marriage Actor Reaction
गेल्या काही दिवसांपासून फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकार मंडळी आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिले आहे. ते त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी चर्चेत राहिले आहेत. सध्या आणखी एका सेलिब्रिटी कपलच्या घटस्फोटाची चर्चा चाहत्यांमध्ये सुरु आहे. ते सेलिब्रिटी कपल म्हणजे, दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम… टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील या लोकप्रिय कपलला रुहान नावाचा मुलगादेखील आहे. दीपिका- इब्राहिम कायमच सोशल मीडियावर चर्चेत राहणाऱ्या कपलपैकी एक आहे. त्यांच्या युट्यूब चॅनेलवरुन व्हिडिओ शेअर करत ते दोघेही पर्सनल आयुष्याबाबत चाहत्यांना अपडेट देत असतात. मात्र, आता ते घटस्फोट घेत वेगळे होणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.
ऋतिक रोशन, फरहान अख्तर आणि अभय देओल पुन्हा एकत्र, नेमकं कारण काय ?
दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम लग्नाच्या ७ वर्षांनंतर घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहेत. दीपिका आणि शोएब यांना दोघांनाही आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे नेटकरी ट्रोल करत असतात. घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या व्हायरल झाल्यानंतर दीपिका आणि शोएबने एका व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांना याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या दोघांचं एक युट्यूब चॅनलही आहे. त्या युट्यूब चॅनेलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दीपिका आणि शोएबने या सगळ्या घटस्फोटाच्या अफवा असून आम्ही घटस्फोट घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्कर घटस्फोटाच्या चर्चांवर इब्राहिमने प्रतिक्रिया दिली आहे. या जोडप्याने घटस्फोटाच्या बातम्या नाकारल्या आहेत. ब्लॉगमध्ये, शोएब इब्राहिमने गंमतीने दीपिका कक्करला विचारले की इंडस्ट्रीमध्ये आणखी एक लग्न तुटल्याच्या बातम्या येत आहेत. ज्यावर दीपिका गमतीने म्हणते, ‘मी तुला का सांगू? मी हे सर्व गुप्तपणे करेन. हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. यावर शोएब म्हणाला, ‘आज मी ऐकत आहे की आपण दोघे वेगळे होत आहोत. शेवटी दीपिकाने ठरवले की दीपिका वेगळी होत आहे.’ त्यानंतर शोएब त्याच्या कुटुंबाकडे जातो आणि त्यांना या खोट्या बातमीबद्दल सांगतो.
समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावर आधारित ‘राष्ट्रगुरु समर्थ रामदास’चित्रपटाचा टीझर प्रदर्शित!
शोएब- दीपिकाच्या घटस्फोटाचे वृत्त ऐकून सर्वजण सुरुवातीला धक्का बसतात आणि नंतर मोठ्याने हसायला लागतात. हसता- हसता शोएबचे कुटुंबीय त्याला विचारतात की, अशा खोट्या बातम्या का प्रसारित केल्या जात आहेत. शोएबची आई विचारते की तो एवढं मोठं खोटं का बोलत आहे. यावर शोएब म्हणतो की ‘मी कधीच या सगळ्याबद्दल बोलत नव्हतो, आता सगळेच याबद्दल बोलत आहेत, तर आपण प्रतिक्रिया का द्यावी.’ घटस्फोटाची चर्चा झाल्यानंतर कुटुंबीयांसोबत दीपिका आणि शोएबने घरातले सगळ्यांनी रोजाचा उपवास सोडला. दरम्यान, दीपिका आणि शोएबने २०१८ मध्ये निकाह करत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. दीपिकाचं हे दुसरं लग्न आहे. शोएबशी निकाह करण्यासाठी दीपिकाने धर्मांतर करत मुस्लीम धर्म स्वीकारला होता.