Zindagi Na Milegi Dobara 2 Farhan Akhtar Breaks Silence On Sequel With Hrithik Roshan Abhay Deol Amid Viral Video
चित्रपट ‘जिंदगी का ना मिलेगी दुबारा’मधील बॉलिवुडचे लोकप्रिय त्रिकूट ऋतिक रोशन, फरहान अख्तर व अक्षय देओल असलेल्या व्हायरल व्हिडिओबाबत अनेक आठवडे चर्चा झाल्यानंतर अखेर रहस्याचा उलगडा झाला आहे. यस आयलँडची नवीन मोहिम जिंदगी को यस बोलने बहुप्रतिष्ठित पुनर्मिलनासाठी मूळ कलाकारांना पुन्हा एकत्र आणले आहे, तसेच या चित्रपटाला लोकप्रिय केलेल्या साहस व मैत्रीच्या उत्साहाला साजरे करत आहे. हा प्रतिष्ठित चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या चौदा वर्षांनंतर चाहत्यांना चित्रपटाच्या सीक्वेलबाबत जाणून घेण्याची संधी मिळाली आहे, जेथे हे तिघेही नवीन साहसावर जाण्यास सज्ज आहेत, ज्यामध्ये यस आयलँडवरील आव्हाने, रोमांच आणि संस्मरणीय क्षणांचा समावेश आहे.
समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावर आधारित ‘राष्ट्रगुरु समर्थ रामदास’चित्रपटाचा टीझर प्रदर्शित!
उत्साहवर्धक ट्रेलरसह मोहिमेला सुरूवात झाली आहे, जेथे पाच एपिसोड्सची सिरीज सुरू होत आहे, ज्यामध्ये ऋतिक, फरहान व अभय यस आयलँडमध्ये सर्वात आयकॉनिक अनुभव घेताना दिसतील. चित्रपटाच्या मूळ थीमला पुन्हा उजाळा देत प्रत्येक पात्र एकमेकांना आव्हान देतात, प्रत्येक ॲडव्हेन्चरला ‘यस’ म्हणत ‘जिंदगी को यस बोल’चा उत्साह आत्मसात करतात. उच्चवर्धक रोमांचपासून उल्लेखनीय अनुभवांपर्यंत ही सिरीज जुन्या आठवणी ताज्या करते, तसेच विनोदी क्षणांचा आनंद देते आणि जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्यास प्ररित करते.
एपिक साहसासोबत तितकाच एपिक साऊंडट्रॅक आहे. फक्त या मोहिमेसाठी संगीतबद्ध करण्यात आलेले नवीन जिंगल यस आयलँडचा उत्साह व ऊर्जेला कॅप्चर करते, ज्यामधून धमाल उत्साह साहसी प्रवास संपल्यानंतर तुमच्यासोबत राहण्याची खात्री मिळते.
मिरल डेस्टिनेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी लियम फिंडले आपला आनंद व्यक्त करत म्हणाले, ”ही मोहिम मैत्री व साहसाच्या उत्साहाला साजरे करते, जसे १४ वर्षांपूर्वी या चित्रपटाने केले होते. यस आयलँड संस्मरणीय क्षणांसाठी परिपूर्ण गंतव्य आहे आणि आम्हाला ऋतिक, फरहान व अभय यांच्यासोबत हा अनुभव प्रत्यक्षात आणण्याचा आनंद होत आहे.”
या सिरीजसाठी स्क्रिप्टचे सह-लेखन केलेले चित्रपटनिर्माते झोया अख्तर व रीमा काग्ती म्हणाले, ”आमला यस आयलँडसोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे आणि अनेक वर्षांनंतर आजही हा चित्रपट प्रेक्षकांशी संलग्न असल्याचे पाहून अद्भुत वाटत आहे. या चित्रपटाने तुम्हाला कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्यास प्रेरित केले आहे आणि आम्ही या चित्रपटाला मिळालेल्या प्रेमासाठी कृतज्ञ आहोत.”
चाहते यस आयलँडच्या ऑफिशियल सोशल मीडिया चॅनेल्सशी संलग्न राहत आगामी एपिसोड्समधील त्रिकूटाच्या ॲडव्हेन्चरला फॉलो करू शकतात. प्रत्येक एपिसोडमध्ये नवीन आव्हाने व उल्लेखनीय अनुभवांना अनलॉक करण्यासह ‘जिंदगी को यस बोल’ संस्मरणीय प्रवास असण्याकरिता सज्ज आहे, जो मैत्री, साहसाच्या उत्साहाला साजरे करतो आणि जीवनातील उत्साहाला ‘यस’ म्हणतो