Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तेजस्विनी पंडित नव्या ऐतिहासिक भु्मिकेत, ‘स्वराज्य कनिका – जिजाऊ’ चित्रपटात साकारणार महत्त्वाची भुमिका!

जगाला दिशा देणाऱ्या या जगत्जननीच्या आयुष्यावर आधारित 'स्वराज्य कनिका जिजाऊ' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटात जिजाऊंची भूमिका तेजस्विनी पंडित साकारणार आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 12, 2024 | 01:37 PM
तेजस्विनी पंडित नव्या ऐतिहासिक भु्मिकेत, ‘स्वराज्य कनिका – जिजाऊ’ चित्रपटात साकारणार महत्त्वाची भुमिका!
Follow Us
Close
Follow Us:

विविधांगी भुमिका साकारण्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडीत. आपल्या दमदार अभिनयाने मराठी सिनेसृष्टीवर छाप सोडणारी तेजस्विनी नेहमी चित्रपटामध्ये हटके भुमिका करते. आता तेजस्विनी लवकरच एका ऐतिहासिक चित्रपटातुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गाला दिशा देणाऱ्या या जगत्जननीच्या आयुष्यावर आधारित ‘स्वराज्य कनिका जिजाऊ’  (Swarajya Kanika Jijau) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटात जिजाऊंची भूमिका तेजस्विनी पंडित साकारणार आहे. ज्यांनी हिंदवी स्वराज्याची पायाभरणी करून या मुलुखाला छत्रपती शिवाजी महाराज दिले, त्या राष्ट्रमाता, राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले यांच्या भुमिकेत तेजस्वी दिसणार आहे.  ६ फायरफ्लाईज प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन अनुजा देशपांडे या करत आहेत.

[read_also content=”‘बाळासाहेब वाघ आहेत, तर तुम्ही महाराष्ट्राला लागलेला डाग आहात’- संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना टोला https://www.navarashtra.com/maharashtra/sanjay-raut-slams-devendra-fadnavis-amid-narendra-modi-maharashtra-visit-and-ram-mandir-nrps-497364.html”]

अनुजा देशपांडेचं दिग्दर्शन

चित्रपटाबद्दल दिग्दर्शिका अनुजा देशपांडे म्हणतात, “राजा नंतर घडतो, आधी घडते ती राजमाता’’ राजमाता जिजाऊसाहेब या लोकजीवनाला जोडणारी अस्मिता तर आहेतच पण त्याचबरोबर मराठी माणसाला त्याच्या अस्तित्वाची-सामर्थ्याची जाणीव करून देणारी एक शक्ती आहेत . हा अभिमान व जाणीव उराशी बाळगून वीरकन्या ते वीरमातेच्या जीवनकाळचे कथानक २-२.३० तासात मांडणे एक लेखिका म्हणून माझ्यासाठी आव्हानात्मक होते . जिजाऊसाहेबांच्या आयुष्यावरील वेगळ्या धाटणीचा हा चित्रपट आहे. जिजाऊसाहेबांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व ,त्यांच्या आयुष्यातील न उलगडलेले प्रसंग-घटना आम्ही प्रेकक्षकांना दाखवणार आहोत.

एक युगपुरुष घडविणाऱ्या ह्या विलक्षण वात्सल्यमुर्तीला मानाचा मुजरा व साष्टांग प्रणिपात. जिजाऊसाहेबांचे व्यक्तिमत्व अभ्यासत /लिहित असताना माझ्या डोक्यात सारखा विचार असायचा की, ही असामान्य भूमिका साकारण्यासाठी उत्तम व्यक्तिमत्व, उत्तम अभिनय असणारी अभिनेत्री मला हवी होती . तेजस्वीनी एक दर्जेदार अभिनेत्री तर आहेच शिवाय एक व्यक्ति म्हणून ती प्रेमळ आहे. त्याचसोबत एक उत्तम मार्गदर्शक व सहाय्यक आहे. तिच्या कामाप्रती ती खूप समर्पित व प्रामाणिक आहे. जिजाऊंचा करारीपणा तिच्यात झळकतो. मला पूर्ण खात्री आहे ती जिजाऊसाहेबांची भूमिका अगदी चोखपणे साकारेल.’’

तेजस्विनी पंडित जीजाऊंच्या भुमिकेत

तेजस्विनी पंडित आपल्या भूमिकेबद्दल म्हणाली, ‘’ज्या स्त्रीने गुलामगिरीच्या काळोखात जखडलेल्या हिंद प्रांताला स्वतंत्र राज्य – स्वराज्य मिळावे हे स्वप्न पहिल्यांदा पाहिले, त्यासाठी वर्षानुवर्ष त्या झिजल्या, त्या भूमिकेवर अटल राहिल्या. कुठलीही गोष्ट प्रवाहाच्या विरोधात जाऊन करणे म्हणजेच क्रांती होय !! अशा राजमाता स्वराज्य जननी जिजाऊसाहेबांची भूमिका करायला माझी निवड केली ह्याबद्दल मी अनुजा ताईंची शतशः आभारी आहे. ही भूमिका करायला मिळणं ही निश्चितच आनंदाची बाब आहे मात्र त्याहून जास्त जबाबदारी आहे ह्याची मला पूर्ण जाणीव आहे. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला, त्यांना घडवले ती माऊली स्वतः निश्चितच त्याच ताकदीची, पराक्रमी, अत्यंत कुशल राजनैतिक आणि मुख्य म्हणजे दूर दृष्टीची असणार यात कसलेच दुमत नाही .अशा ह्या विलक्षण वीरमातेला पडद्यावर साकारणे हे माझे अहोभाग्यच !’’

Web Title: Tejaswini pandit will play role of rajmata jijau in marathi movie swrajya kanika jijau nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2024 | 01:12 PM

Topics:  

  • entertainment
  • tejaswini pandit

संबंधित बातम्या

वयाच्या ५ व्या वर्षी मिळवला राष्ट्रीय पुरस्कार, नेहरुंनी दिलं सदऱ्यावरील गुलाब; जाणून घ्या ‘या’ मराठमोळा अभिनेत्याची कारकीर्द
1

वयाच्या ५ व्या वर्षी मिळवला राष्ट्रीय पुरस्कार, नेहरुंनी दिलं सदऱ्यावरील गुलाब; जाणून घ्या ‘या’ मराठमोळा अभिनेत्याची कारकीर्द

Jyoti Chandekar funeral: आईला शेवटचा निरोप देताना भावुक झाली तेजस्विनी, मुखाग्नी देताना ढसाढसा रडली
2

Jyoti Chandekar funeral: आईला शेवटचा निरोप देताना भावुक झाली तेजस्विनी, मुखाग्नी देताना ढसाढसा रडली

प्रसिद्ध अभिनेता नकुल मेहता दुसऱ्यांदा झाला बाबा; लग्नाच्या १३ वर्षानंतर केले गोंडस मुलीचे स्वागत
3

प्रसिद्ध अभिनेता नकुल मेहता दुसऱ्यांदा झाला बाबा; लग्नाच्या १३ वर्षानंतर केले गोंडस मुलीचे स्वागत

एल्विश यादवच्या घरावर कोणी आणि का केला गोळीबार? संपूर्ण प्रकरणाची ‘या’ गँगने घेतली जबाबदारी
4

एल्विश यादवच्या घरावर कोणी आणि का केला गोळीबार? संपूर्ण प्रकरणाची ‘या’ गँगने घेतली जबाबदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.