Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई आर्ट फेअरच्या ६ व्या आवृत्तीत २५० कलाकार, ३००० हून अधिक कलाकृती, कला रसिकांसाठी पर्वणी!

६वा मुंबई आर्ट फेअर पुन्हा आपल्या भेटीला आले आहे, नेहरू सेंटर, वरळी येथे आर्ट फेअरचं आयोजन करण्यात आलं आहे

  • By अमृता यादव
Updated On: Oct 08, 2025 | 02:47 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम )

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम )

Follow Us
Close
Follow Us:

कला रसिकांसाठी मोठी आनंदाची बातमी! भारतातील उभरत्या कलाकारांसाठी महत्त्वाचं ठरलेले ६वा मुंबई आर्ट फेअर आपल्या भेटीला पुन्हा येत आहे. नेहरू सेंटर, वरळी (डिस्कव्हरी ऑफ इंडिया बिल्डिंग) येथे १० ऑक्टोबर पासून आर्ट फेअरचं आयोजन करण्यात आलं असून १२ ऑक्टोबर पर्यंत चालणारे हे ३ दिवसीय आर्ट फेअर सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत चालणार आहे.

दर वर्षी प्रमाणे याही वर्षी सुद्धा या आर्ट फेअर मध्ये देशभरातील २५० कलाकारांच्या तब्बल ३००० हून अधिक चित्रकला, शिल्पकला, छायाचित्रं, प्रिंट्स यांसह विविध प्रकारच्या कलात्मक अभिव्यक्ती पाहायला मिळणार आहेत.

श्री राजेंद्र पाटील, मुंबई आर्ट फेअरचे डायरेक्टर म्हणाले, “कला प्रदर्शन करण्यापलीकडे जाऊन, हा मेळावा कलाप्रेमींसाठी चिंतन, शांतता आणि कथाकथनाचे नवे क्षण घेऊन येतो. भारतीय कलेच्या आध्यात्मिकतेसह प्रतीकात्मकतेचं दर्शन इथे घडतं. वर्षानुवर्षं विविध शैलींचे कलाकार आणि गॅलरींना एकत्र करून, या मेळाव्याने स्वतःला एक रंगतदार सांस्कृतिक व्यासपीठ म्हणून उभं केलं आहे.”

झी मराठीच्या स्टेजवर एकत्र आल्या खलनायिका, केतकी कुलकर्णीचा धमाकेदार अनुभव म्हणाली; “मी त्यांच्यातली एकटीच Gen Z”

या आवृत्तीत thecurators.art, बूके ऑफ आर्ट गॅलरी, देव मेहता आर्ट गॅलरी, स्टुडिओ ३ आर्ट गॅलरी, RS Art Space, Greyscale (मुंबई), Artecious World Art Gallery, Aura Planet (दिल्ली) आणि अर्पितम कला मंदिर (कोलकाता) या नामवंत गॅलरी सहभागी होत आहेत.
मुंबई आर्ट फेअरमध्ये अलंकारिक, प्रतीकात्मक, अमूर्त, प्रायोगिक ते अति-वास्तववादी अशा वेगवेगळ्या शैलीं दर्शवल्या जातील. ओम थडकर, अश्विन कुमार, देव मेहता, बीना सुराणा, विजय कुमावत, शिरीष कठाळे इत्यादी यांच्या सारखे अनेक लोकप्रिय कलावंत भाग घेणार असून मुंबईकरांसाठी याची तिकीटं BookMyShow वर उपलब्ध आहेत.

पूजा विजयरंजन आणि जेनिफर दारुवाला यांनी सुंदर आणि लक्ष वेधून घेणाऱ्या शैलीत त्यांच्या कलाकृती मांडल्या आहेत. त्यांच्यासोबत पूर्वी लोहाणा, नियती अमलानी, अक्षता शेट्टी आणि उज्ज्वला सुरवाडे यांचे खास चित्र बघायला मिळतील. ही सगळी चित्रं काही गोष्ट सांगत असल्यासारखी वाटतात.

हर्षवर्धन राणेच्या ‘Ek Deewane Ki Deewaniyat’चा ट्रेलर प्रदर्शित; दिसणार अनोखी प्रेम कथा

रश्मी पोटे, उर्वी शाह, रूपाली मानसिंगका, देवी राणी दासगुप्ता आणि सोहन कुमार यांनी साध्या पण अर्थपूर्ण कलाकृती दाखवल्या आहेत. तर शिल्पकार रोहन सोनवणे यांनी धातूपासून बनवलेली खास शिल्पं मांडली आहेत. तसेच, श्रीकांत पोतदार यांची चित्रं खूपच बारकाईने आणि खरीखुरी वाटणारी आहेत. मोनालिसा पारेख, श्वेता रोहिरा, कांता वर्दे आणि सुस्मिता मंडल यांच्या चित्रांमधून अध्यात्म जाणवेल.

कला प्रेमींसाठी लँडस्केप्सपासून, अॅबस्ट्रॅक्ट आणि सेमी अॅबस्ट्रॅक्ट ते रोमँटिक, खेडूत, फुलांचा, आणि शहरी लँडस्केप्सपर्यंत अनेक चित्र पहिलं मिळतील. विशेष म्हणजे वर्षा पाटील, रविशंकर टी आणि कार्तिकेय खटाव यांचे लँडस्केप्स, रिया दास, वत्सला ठाकूर, सुनंदिनी जयंत, डॉ. जेसिका सेराव आणि गगनदीप सिंग कोचर यांचे फ्लॉवरस्केप्स, अश्विन कुमार आणि वसुंधरा नानावटी यांचे ऑइल पेंटिंग आणि रूपाली मानसिंहका यांचे विखुरलेले प्रकाश असलेले सेमी अॅबस्ट्रॅक्ट व्याख्या यांचा समावेश आहे.

Web Title: The 6th edition of mumbai art fair features 250 artists over 3000 artworks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2025 | 02:47 PM

Topics:  

  • Drawing
  • Mumbai
  • Photo

संबंधित बातम्या

BMC land lease: मुंबई पालिका भूखंड भाडे तत्वावर देणार! उत्पन्नवाढीसाठी पालिकेने कसली कंबर; करारातून किमान २०० कोटींची होणार कमाई
1

BMC land lease: मुंबई पालिका भूखंड भाडे तत्वावर देणार! उत्पन्नवाढीसाठी पालिकेने कसली कंबर; करारातून किमान २०० कोटींची होणार कमाई

Middle Class EMI: “मुंबईतील प्रदूषित समुद्र पाहण्यासाठी ५,००,००० चा ईएमआय”, मध्यमवर्गीयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला
2

Middle Class EMI: “मुंबईतील प्रदूषित समुद्र पाहण्यासाठी ५,००,००० चा ईएमआय”, मध्यमवर्गीयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला

शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुखांची घोषणा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्षाकडून दिग्गजांची नियुक्ती
3

शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुखांची घोषणा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्षाकडून दिग्गजांची नियुक्ती

Mumbai Local Block: प्रवाशांनो लक्ष द्या! लोकल रद्द, एक्स्प्रेसवरही परिणाम; मध्य रेल्वेवर आजपासून 12 दिवस ब्लॉक
4

Mumbai Local Block: प्रवाशांनो लक्ष द्या! लोकल रद्द, एक्स्प्रेसवरही परिणाम; मध्य रेल्वेवर आजपासून 12 दिवस ब्लॉक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.