(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठवाड्यात आणि इतर भागांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतांतील पिकं तर वाहून गेलीच, पण सुपीक मातीही नष्ट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
या पार्श्वभूमीवर मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यांनी त्यांच्या प्रसिद्ध नाटक ‘सखाराम बाईंडर’ च्या १० प्रयोगांचे संपूर्ण मानधन पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. सयाजी शिंदे आणि त्यांच्या टीमच्या या सामाजिक जाणिवेच्या निर्णयाचं सर्वत्र मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. या कृतीमधून त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की, कलावंत फक्त रंगमंचावरच नव्हे, तर समाजासाठीही महत्वाची भूमिका बजावत असतो.या निर्णयामुळे अनेक कलाकार आणि नागरिकांमध्येही पूरग्रस्तांसाठी मदतीची भावना अधिक बळकट होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
पिंक पॉवर रन 2025 मध्ये अभिनेता दारासिंग खुराना आणि लिअँडर पेस एकत्र दिसले
मराठी रंगभूमीवरील नामवंत नाटककार विजय तेंडुलकर यांच्या ‘सखाराम बाईंडर’ या गाजलेल्या नाटकातून ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी रंगभूमीवर दमदार पुनरागमन केलं आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग नुकताच दिल्लीत पार पडला आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. ही बिकट परिस्थिती पाहता सयाजी शिंदे आणि त्यांच्या टीमने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ ने ३ दिवसांत केली २२ कोटींची कमाई!
दिल्लीतील प्रयोगातून जमा होणारे सर्व उत्पन्न पूरग्रस्त लोकांना मदत म्हणून दिले जाईल, अशी माहिती कार्यकारी निर्माते निखिल जाधव यांनी यावेळी दिली आहे. तर सयाजी शिंदे हे सुमुख चित्र प्रोडक्शनसाठी सखाराम बाइंडरचे पुढील दहा प्रयोग केवळ १ रुपया मानधन घेऊन करणार आहेत. त्यांची उर्वरित मानधनाची संपूर्ण रक्कमही महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना दिली जाईल. यावेळी बोलताना सयाजी शिंदे म्हणाले की, “मराठवाडा पावसावाचून मरत होता, आता तो पावसामुळे मरतोय, इतकी अवस्था वाईट आहे”.राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अशा परिस्थिती अनेक कलाकार मंडळी मदत करताना दिसत आहेत.