Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘श्यामची आई’ चित्रपटाचा फर्स्ट लूक आला समोर…साने गुरुजींची भूमिका साकारतोय ‘हा’ अभिनेता

ओम भूतकर एक कसलेला आणि चतुरस्र अभिनेता आहे. त्यानं यापूर्वी नेहमीच वेगवेगळ्या छटा असलेल्या व्यक्तिरेखांना अचूक न्याय दिला आहे. संवादफेकीपासून देहबोलीपर्यंत अभिनयाच्या प्रत्येक अंगावर त्यानं आपलं प्रभुत्व सिद्ध केलं आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 15, 2022 | 12:00 PM
‘श्यामची आई’ चित्रपटाचा फर्स्ट लूक आला समोर…साने गुरुजींची भूमिका साकारतोय ‘हा’ अभिनेता
Follow Us
Close
Follow Us:

मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशभर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. या निमित्तानं स्वातंत्र्यपूर्व काळातील आठवणींसोबतच क्रांतिकारकांच्या स्मृतींना उजाळा दिला जात आहे. याच काळात समाजात वैचारिक क्रांती घडवत काही थोर मंडळींनी सुसंस्कृत समाजाच्या जडणघडणीत मोलाचं योगदान दिलं आहे. साने गुरूजींसारख्या शिक्षकी पेशा असणाऱ्या अवलियानं आपल्या प्रत्येक वर्तणुकीतून समाजाला धडे देण्याचं, शिकवण्याचं काम केलं आहे. आता हेच साने गुरुजी रुपेरी पडद्याच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘श्यामची आई'(Shyamchi Aai)  या आगामी मराठी चित्रपटात साने गुरुजींच जीवन दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटाचं फर्स्ट लूक पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आलं असूून हरहुन्नरी अभिनेता ओम भूतकरनं (Om Bhutkar) साने गुरुजींची भूमिका साकारली आहे.

अमृता फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मात्या अमृता अरुण राव यांनी ‘श्यामची आई’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. निर्मात्या अमृता अरुण राव यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक विषयांवरील चित्रपटांची निर्मिती केली आहे. नेहमीच काहीतरी वेगळं करण्याच्या ध्यासानं पछाडलेला, तसंच बरेच पुरस्कार पटकावणाऱ्या तरुण दिग्दर्शक सुजय डहाकेनं ‘श्यामची आई’चं दिग्दर्शन केलं आहे. ‘श्यामची आई’ ही साने गुरुजींची कथा असल्यानं यात त्यांची व्यक्तिरेखा कोण साकारणार? याबाबत सर्वांनाच कुतूहल होतं. आता हे रहस्य उलगडलं आहे. नुकतंच या चित्रपटातील साने गुरुजींचा फर्स्ट लुक रिव्हील करणारं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. यापूर्वी नाटकांसोबतच बऱ्याच चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारणारा ओम भूतकर या चित्रपटात साने गुरुजींची मुख्य भूमिका साकारणार आहे. ‘श्यामची आई’च्या निमित्तानं ओमनं पुन्हा एक नवं आव्हान स्वीकारलं आहे. यापूर्वी अँग्री यंग मॅन स्टाईल भूमिका साकारणारा ओम ‘श्यामची आई’मध्ये संयमी शिक्षकाच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. एखाद्या अभिनेत्याच्या करियरमधील माईलस्टोन ठरावी अशी ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ओमनं खूप मेहनत घेतली आहे. साने गुरुजींसारखा लुक देण्यापासून त्यांच्यासारखा अभिनय करण्यासाठी ओमनं बराच सराव केला आहे. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये बनवण्यात आलेला हा चित्रपट प्रेक्षकांना कृष्णधवल युगात घेऊन जाणार आहे. या चित्रपटातील तीनही गाण्यांना संगीत देण्याची जबाबदारी ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.

[read_also content=”‘लाल सिंह चड्ढा’ला सपोर्ट करणं हृतिकला पडणार महागात? नेटकऱ्यांकडून ट्रोलींग सुरू https://www.navarashtra.com/movies/acor-hritik-roshan-trolled-on-internet-for-supporting-lal-singh-chaddha-nrps-316197.html”]

साने गुरुजींच्या भूमिकेत ओम भूतकर

ओम भूतकर एक कसलेला आणि चतुरस्र अभिनेता आहे. त्यानं यापूर्वी नेहमीच वेगवेगळ्या छटा असलेल्या व्यक्तिरेखांना अचूक न्याय दिला आहे. संवादफेकीपासून देहबोलीपर्यंत अभिनयाच्या प्रत्येक अंगावर त्यानं आपलं प्रभुत्व सिद्ध केलं आहे. याच बळावर ओमनं बऱ्याच पुरस्कारांवरही आपलं नाव कोरण्यात यश मिळवलं आहे. साने गुरुजींच्या व्यक्तिरेखेचा विचार करत असताना सर्व बाजूंनी परिपूर्ण असणाऱ्या अभिनेत्याची गरज होती. या व्याख्येत ओम परफेक्ट बसत असल्यानं साने गुरुजींची भूमिका साकारण्यासाठी त्याची निवड केल्याचं मत सुजय डहाकेनं व्यक्त केलं आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना एक वेगळाच ओम पहायला मिळणार आहे.

[read_also content=”आरएसएस मुख्यालयात स्वांतत्र्यदिन साजरा, मोहन भागवतांनी केलं ध्वजारोहण https://www.navarashtra.com/maharashtra/independence-day-celebration-at-rss-headquarters-mohan-bhagwat-hoisted-the-flag-nrps-316158.html”]

Web Title: The first look of the movie shyamchi aai is out nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2022 | 12:00 PM

Topics:  

  • navarashtra news
  • Shyamchi Aai

संबंधित बातम्या

Top Marathi News Today Updates : गोंदियात छगन भुजबळांचा ध्वजारोहणास नकार; प्रकृतीचे दिले कारण
1

Top Marathi News Today Updates : गोंदियात छगन भुजबळांचा ध्वजारोहणास नकार; प्रकृतीचे दिले कारण

Top Marathi News Today : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
2

Top Marathi News Today : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

World Hypertension Day: मुलांमध्ये वाढत्या उच्च रक्तदाबाचे संकट गंभीर
3

World Hypertension Day: मुलांमध्ये वाढत्या उच्च रक्तदाबाचे संकट गंभीर

Navarashtra Woman Awards : वर्षाराणी शिंदेंना नवभारत नवराष्ट्रचा आदर्श समाजसेविका पुरस्कार प्रदान
4

Navarashtra Woman Awards : वर्षाराणी शिंदेंना नवभारत नवराष्ट्रचा आदर्श समाजसेविका पुरस्कार प्रदान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.