Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओटीटीवर पाहता येणार विठोबाच्या पाऊलखुणांवर चालायला लावणारे चित्रपट, आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल भक्तीचा गजर अनुभवा

आध्यात्मिक वारसा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आषाढी एकादशीच्या निमित्तानं खास ओटीटीवर काही निवडक आणि भक्तीने भरलेल्या चित्रपट आणि खास मालिका तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.

  • By चेतन बोडके
Updated On: Jun 24, 2025 | 09:17 PM
ओटीटीवर पाहता येणार विठोबाच्या पाऊलखुणांवर चालायला लावणारे चित्रपट, आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल भक्तीचा गजर अनुभवा

ओटीटीवर पाहता येणार विठोबाच्या पाऊलखुणांवर चालायला लावणारे चित्रपट, आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल भक्तीचा गजर अनुभवा

Follow Us
Close
Follow Us:

एकेकाळी घरात सकाळी उठल्यावर देवाजवळ दिवा लावायचो, आणि अभंग ऐकत दिवसाची भक्तिमय सुरुवात करायचो… पण आता काय? हे सर्व हरवलंय…मोबाईल, लॅपटॉप, सोशल मिडिया यांच्या गर्दीत भक्ती कुठेतरी हरवली आहे. आपल्या संतांनी दिलेल्या शिकवणीत केवळ भक्ती नाही, तर जीवन जगण्याचं खरं तत्त्वज्ञान दडलं आहे. प्रत्येक अडचण, संघर्ष, दुःख यांना सामोरं जाण्याचं बळ त्यांनी आपल्याला त्यांच्या विचारांतून दिलं. ही शिकवण म्हणजे आपल्या संस्कृतीची अमोल देणगी आहे. वारकऱ्यांनी ही परंपरा पिढ्यानपिढ्या जपली, वारी करत ती शिकवण आपल्या जीवनात रुजवली. संतांनी दिलेल्या मार्गदर्शनातून आता पुढे जाण्याची, त्या विचारांना आपल्या आयुष्यात आत्मसात करण्याची वेळ आली आहे. म्हणूनच आम्ही हा आध्यात्मिक वारसा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आषाढी एकादशीच्या निमित्तानं खास अल्ट्रा झकास ओटीटीवर काही निवडक आणि भक्तीने भरलेल्या चित्रपट आणि खास मालिका तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.

प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार, सुबोध आणि तेजश्रीच्या नव्या मालिकेचा प्रोमो रिलीज; काही तासांतच होणार घोषणा

ज्ञानेश्वर माऊली (टीव्ही मालिका)

‘ज्ञानेश्वर माऊली’ ही लोकप्रिय मालिका म्हणजे फक्त संत ज्ञानेश्वरांची कथा नाही, तर ती त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्याची एक सजीव अनुभूती आहे. ही मालिका ज्ञानेश्वरांच्या जन्मापासून ते त्यांच्या समाधीपर्यंतचा प्रवास आपल्यासमोर उलघडते. लहान वयातच त्यांना समाजाने डावललं, पण त्यांनी शिक्षण, साधना आणि भक्तीच्या माध्यमातून आपला वेगळा मार्ग तयार केला. त्यांच्या लिखाणातून – विशेषतः ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथातून – त्यांनी संपूर्ण समाजाला परमेश्वराच्या जवळ नेलं.

या मालिकेत आपल्याला त्यांचं भावपूर्ण बालपण, आई-वडिलांची साथ, भावंडांमध्ये असलेलं प्रेम, आणि त्यांची अध्यात्मिक उंची याचा मनाला भिडणारा प्रवास पाहायला मिळतो. गाणी आणि अभंग हे वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार उभारले आहेत – जे आपल्याला पंढरपूरच्या वारीची आणि चंद्रभागेच्या पाण्याची आठवण करून देतात.

आजच्या पिढीला संत ज्ञानेश्वर कोण होते, त्यांनी काय शिकवलं, हे समजून घ्यायचं असेल तर “ज्ञानेश्वर माऊली” ही मालिका पाहणं म्हणजे त्यांना प्रत्यक्ष भेटण्यासारखं आहे. ही मालिका मनाला शांती देते, श्रद्धा जागवते आणि नव्या पिढीला संस्कारांची आणि भक्तीची उंची काय असते हे दाखवते.

Panchayat 4 वेबसीरीज झाली लिक, फ्री डाऊनलोड करण्यासाठी युजर्सने शेअर केल्या लिंक्स

संत गोरा कुंभार

संत गोरा कुंभार या चित्रपटात भगवान विठ्ठलाचे परमभक्त असलेल्या आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक थोर संत यांची कथा आहे. मातीची भांडी बनवणारे संत गोरा कुंभार, शरीराने कार्यरत असायचे पण मन मात्र नेहमीच पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन असायचे. एकदा भजनात तल्लीन होऊन त्यांनी चुकून स्वतःच्या लहान मुलालाच पायाखाली तुडवलं. पण गोरा कुंभारांची निस्सीम भक्ती आणि निर्मळ भावना पाहून, विठोबाने त्यांच्या मुलाला पुन्हा जीवनदान दिलं. खरंच, हा क्षण चित्रपटात पाहण्यासारखा आहे.

देवाचिये द्वारी

लहान वयातही मोठा आध्यात्मिक संदेश देणारा “देवाचिये द्वारी” हा चित्रपट संत ज्ञानेश्वरांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांनी सांगितलेला संदेश असा की “देव सगळ्यांत आहे, तो आपल्या मनातही असतो” आणि हाच संदेश प्रेक्षकांच्या मनाला थेट भिडतो. हा सिनेमा श्रद्धेचा, आत्मविश्वासाचा आणि भक्तीच्या खऱ्या अर्थाचा मागोवा घेतो, आणि आपल्याला भक्ती म्हणजे केवळ विधी नव्हे, तर अंतःकरणाची गाठ असल्याची जाणीव करून देतो.

Ultra Jhakas OTT वर घरबसल्या पाहायला मिळणार साऊथ थ्रिलरचा धमाका…

संत निवृत्ती ज्ञानदेव

या चित्रपटात निवृत्ती आणि ज्ञानेश्वर या दोन भावंडांची खरी भक्ती, त्यांचा कठीण संघर्ष आणि प्रेरणादायी आध्यात्मिक प्रवास प्रभावीपणे उलगडला आहे. अनेक अडचणींना सामोरे जात त्यांनी समाजात भक्ती, प्रेम आणि समतेचा संदेश पसरवला. त्यांच्या शिकवणींमधून देवप्रेम, समर्पण आणि आत्मिक शुद्धतेचा अर्थ उलगडतो. हा चित्रपट म्हणजे भक्तीच्या मूळ तत्त्वांचा आणि ज्ञानेश्वरी विचारसरणीचा एक सजीव भावनिक अनुभव आहे.

> ढ लेकाचा

पुरस्कारप्राप्त ‘ढ लेकाचा’ या चित्रपटात बाप-लेकाच्या नात्यातील ताणतणाव, समज-गैरसमज आणि भक्तीमधून घडणारा सकारात्मक बदल मांडण्यात आला आहे. या कथेत विठ्ठलाचे भक्त अण्णा हे प्रमुख पात्र असून, त्यांच्या भक्तीची गहिवरलेली छटा दोन भावस्पर्शी गाण्यांमधून दाखवण्यात आली आहे. पहिलं गाणं ‘मन धावतया चंद्रभागे काठी’ विठोबाच्या दर्शनासाठी आतुरतेने धावणाऱ्या मनाची भावना व्यक्त करतं, तर दुसरं गाणं ‘ऐलतिरी एकला मी’ ही एक भावनांनी भरलेली रचना असून, भक्तीच्या मार्गावर अनुभवाला येणाऱ्या एकटेपणाची आणि आत्मचिंतनाची गहिरी जाणीव करून देते.

प्रसिद्ध अभिनेत्री सना खानवर कोसळला दुःखाचा डोंगर, अभिनेत्रीच्या आईचे निधन; व्यक्त केले दुःख

माहेर माझं हे पंढरपूर

ही कथा आहे भगवान पांडुरंगावर निस्सीम श्रद्धा असलेल्या एका तरुणीची. जिच्या निखळ भक्तीमुळे तिला आयुष्यातील अनेक संकटांवर मात करण्याची शक्ती मिळते. तिच्या भक्तिमार्गावर एकामागून एक चमत्कार घडू लागतात आणि तिचं अंतःकरण विठ्ठलमय होतं. हळूहळू तिचं घर, तिचं आयुष्य, तिचा प्रत्येक श्वास विठोबामध्ये विलीन होतो. आणि शेवटी तिला उमगतं की पंढरी ही केवळ एक जागा नाही, ती एक अनुभूती आहे…आणि पंढरपूर हेच तिचं खरं माहेरघर आहे.

अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट ग्रुपचे सी.ई.ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले “आजच्या डिजिटल युगात, श्रद्धा, भक्ती आणि आपल्या संतांची शिकवण कुठेतरी मागे पडत चाललीय. आपली संस्कृती ही फक्त ग्रंथात किंवा मंदिरापुरती मर्यादित राहू नये, ती आपल्या घराघरात, लहान मुलांना देखील समजायला हवी. म्हणूनच आम्ही अल्ट्रा झकास ओटीटी वर अशा चित्रपटांचा खजिना आणतोय, जे फक्त मनोरंजन करत नाहीत, तर पुन्हा एकदा आपल्याला विठोबाच्या पाऊलखुणांवर चालायला प्रवृत्त करतात.”

Web Title: This aashadhi ekadashi 2025 watch vitthal special serial and movies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2025 | 09:17 PM

Topics:  

  • OTT platform
  • OTT Release
  • OTT series
  • VitthalRukmini

संबंधित बातम्या

Andhera: OTT वर धडकणार ‘अंधेरा’ ही भयानक वेब सिरीज; जाणून घ्या कुठे कधी होणार प्रदर्शित
1

Andhera: OTT वर धडकणार ‘अंधेरा’ ही भयानक वेब सिरीज; जाणून घ्या कुठे कधी होणार प्रदर्शित

OTT सबस्क्रिप्शनचा नवा नियम होणार लागू? प्लॅन कॅन्सल करणं होणार आणखी कठीण? नेमकं प्रकरण आहे तरी काय?
2

OTT सबस्क्रिप्शनचा नवा नियम होणार लागू? प्लॅन कॅन्सल करणं होणार आणखी कठीण? नेमकं प्रकरण आहे तरी काय?

संजय दत्त- मौनी रॉयचा ‘द भूतनी’ लवकरच ओटीटीवर रिलीज होणार, कधी आणि कुठे रिलीज होणार चित्रपट?
3

संजय दत्त- मौनी रॉयचा ‘द भूतनी’ लवकरच ओटीटीवर रिलीज होणार, कधी आणि कुठे रिलीज होणार चित्रपट?

अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर पावसाळ्यात आता थरार, रहस्य आणि डब मराठी चित्रपटांचा मेगा वर्षाव!
4

अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर पावसाळ्यात आता थरार, रहस्य आणि डब मराठी चित्रपटांचा मेगा वर्षाव!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.