(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस १३ फेम रश्मी देसाईने तिच्या वैयक्तिक प्रवासाबद्दल नुकताच खुलासा केलाय. चमकत्या ग्लॅमरच्या जगामध्ये दिसणाऱ्या तेजस्वी चेहऱ्यांमागे अनेक संघर्ष लपलेले असतात, ‘उतरन’ या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रश्मी देसाई पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी तिच्या अभिनयामुळे नाही, तर तिच्या आरोग्यप्रवासामुळे. रश्मी सध्या गंभीर आरोग्य समस्यांशी लढत आहे. सध्या ती आयुष्यातील विविध समस्यांचा सामना करत आहे. वैयक्तिक आयुष्यात आलेल्या अपयशानंतर तिला अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं. रश्मीने सांगितलं की घटस्फोटानंतर ती गेली काही वर्षं एकटीच राहत आहे.
रश्मीने अलीकडेच एक भावनिक आणि प्रेरणादायक खुलासा करत सांगितलं की ती सध्या वजन कमी करण्याच्या प्रवासात आहे, आणि तो प्रवास तितका सोपा नव्हता.तिला अनेक आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत आहे. “हा प्रवास सोपा नव्हता. मला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. पण मला विश्वास आहे की मी ते करू शकेन, कारण माझा स्वतःवर विश्वास आहे,” असं रश्मीने सांगितलं. वजन कमी करण्याच्या या प्रवासाने रश्मीला संयम, आत्मविश्वास आणि आरोग्याला प्राधान्य देण्याचं महत्त्व शिकवलं आहे. २०१६ मध्ये पती नंदीश संधू याच्याशी घटस्फोट झाल्यानंतर, रश्मी गेली काही वर्षं एकटी राहत आहे.
Bigg Boss 19: ‘वीकेंड का वार’ दरम्यान कोण जाणार घरा बाहेर? स्पर्धकांनी घेतले ‘या’ सदस्याचे नाव
या काळात तिने अनेक भावनिक चढ-उतारांचा सामना केला. तिने आयुष्याचा अर्थ समजावून सांगताना म्हटलं की, “आपण स्वतःकडून खूप अपेक्षा ठेवतो, आणि हेच मला आता जाणवलं आहे.” यावूर्वी एका पुरस्कार सोहळ्यातील फोटोमुळे रश्मीला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला होता. तिच्या शरीरातील बदलांवर सोशल मीडियावर काही लोकांनी टीका केली होती. यावर प्रतिक्रिया देताना रश्मी म्हणाली,”मी नेहमी २१-२२ वर्षांची दिसू शकत नाही. माझा प्रवास सुंदर आहे, पण काही लोकांसाठी माझा बदल स्वीकारणं कठीण होतं.”