Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोंबिवलीत रंगणार ‘द राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’चा भव्य लाईव्ह कॉन्सर्ट, शास्त्रीय आणि आधुनिक संगीताचा संगम

लवकरच डोंबिवलीत ‘द राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’ या संगीत कलेक्टिव्हच्या सादरीकरणातून रसिकांना अद्भुत अनुभव मिळणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 16, 2026 | 04:40 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

राहुल देशपांडे हे नाव आज घराघरांत परिचित झाले आहे. ते शास्त्रीय संगीताची परंपरा आणि आधुनिकतेचा संगम करत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. पं. वसंतराव देशपांडे यांच्या समृद्ध परंपरेचा वारसा मिळालेल्या राहुल देशपांडे यांनी आपल्या दमदार, भावस्पर्शी आणि तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण गायकीने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.शास्त्रीय बंदिशी, नाट्यसंगीत किंवा भावगीत असो, त्यांच्या सादरीकरणात नेहमी सुरेलपणा, नेमकी लय आणि हृदयाला भिडणारी अभिव्यक्ती अनुभवायला मिळते. ‘कट्यार काळजात घुसली’, ‘घेई छंद मकरंद’, ‘सूर निरागस हो’, ‘रंग रंगीला श्याम’ यांसारख्या गाणी त्यांनी रसिकांच्या मनात कायमस्वरूपी घर करून ठेवली आहेत. लवकरच डोंबिवलीत ‘द राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’ या संगीत कलेक्टिव्हच्या सादरीकरणातून रसिकांना अद्भुत अनुभव मिळणार आहे.

आता राहुल देशपांडेच्या सुरेल प्रवासाचा नवा अध्याय डोंबिवलीत रंगणार आहे. ‘द राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’ हा भव्य लाईव्ह कॉन्सर्ट खास महिला दिनानिमित्त आयोजित केला जात आहे. या कार्यक्रमात विविध शैलीतील संगीताचे निवडक सादरीकरण दिसेल आणि रसिकांसाठी एक अविस्मरणीय मैफल अनुभवता येणार आहे.

हा कॉन्सर्ट फक्त संगीतासाठी नसून सामाजिक कार्यासाठी देखील आहे. तरूण मित्र मंडळ, श्रीखंडेवाडी प्रस्तुत या मैफलेत संगीताच्या माध्यमातून निधी संकलन केला जाणार आहे. संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी इव्हेंट फॅक्टरी यांनी सांभाळली आहे आणि आहार डोंबिवलीकर संस्था यांनी विशेष सहकार्य दिले आहे.

Bigg Boss Marathi 6 : दोन सदस्य घराबाहेर! आता घरातून राखी सावंतला हाकललं? बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट

हा भव्य कार्यक्रम संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथे पार पडणार असून, डोंबिवलीकरांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे. या कॅान्सर्टचे तिकिट्स बुक माय शोवर उपलब्ध आहेत. राहुल देशपांडे यांच्या जादुई आवाजात थेट मैफलीचा अनुभव घेण्याची संधी प्रथमच मिळत असल्याने संगीतप्रेमी प्रचंड उत्सुक आहेत.

या निमित्ताने राहुल देशपांडे म्हणाले, ”डोंबिवलीतील रसिकांसमोर ‘द राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’ सादर करताना मला विशेष आनंद होत आहे. महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या कार्यक्रमातून संगीताचा उत्सव साजरा करायचा आहे. शास्त्रीय संगीतापासून नाट्यसंगीतापर्यंत आणि भावगीतांपासून नव्या धाटणीच्या रचनांपर्यंतचा प्रवास आम्ही या कॉन्सर्टमध्ये घडवणार आहोत. डोंबिवलीकरांनी या सुरेल मैफलीचा जरूर भाग व्हावे.”

Yeh Jawaani Hai Deewani 2 बद्दल एक मोठी अपडेट, रणबीर कपूरने स्वतः सांगितले सिक्वेलबद्दल सत्य, म्हणाला, ”लवकरच…”

Web Title: Grand live concert of the rahul deshpande collective to take place in dombivli a fusion of classical and contemporary music

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Famous Singer
  • Marathi News

संबंधित बातम्या

रायगडचा तरुण घेणार ‌‘गगनभरारी‌’ एव्हिएशन, हॉस्पिटेलिटी आणि हेल्थकेअर क्षेत्रात रोजगाराची सुवर्णसंधी
1

रायगडचा तरुण घेणार ‌‘गगनभरारी‌’ एव्हिएशन, हॉस्पिटेलिटी आणि हेल्थकेअर क्षेत्रात रोजगाराची सुवर्णसंधी

Sangli News : “मतदान करणाऱ्यांची तोंडं आता बंद का?” सांगलीतून काँग्रेसचा भाजपला थेट सवाल!
2

Sangli News : “मतदान करणाऱ्यांची तोंडं आता बंद का?” सांगलीतून काँग्रेसचा भाजपला थेट सवाल!

Bhusawal forced conversion case : पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई ,मुख्य आरोपी गजाआड!
3

Bhusawal forced conversion case : पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई ,मुख्य आरोपी गजाआड!

Vasai Virar News : महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या उपाध्यक्षांची महानगरपालिकेला भेट
4

Vasai Virar News : महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या उपाध्यक्षांची महानगरपालिकेला भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.