the marvels and tiger 3
यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने धमाकेदार होणार आहे यंदाच्या दिवाळीत दोन बहुप्रतिक्षित चित्रपट ‘टायगर थ्री’ (Tiger 3) आणि ‘द मार्व्हल्स’(The Marvels) प्रदर्शित होणार आहेत. हे दोन्ही चित्रपट 10 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहेत. यामुळे यंदाची दिवाळी ॲक्शन आणि थरारपट सिनेप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरणार आहे. सलमान खान (Salman Khan) आणि कॅटरिना कैफची (Katrina Kaif) जोडी ‘टायगर थ्री’ मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. तर ‘द मार्व्हल्स’ मध्ये सुपर हिरो धमाल उडवणार आहेत. या दोन चित्रपटांमुळे सिनेप्रेमींसाठी यंदाची दिवाळी ही डबल बोनान्झा असेल.
‘टायगर थ्री’ हा चित्रपट टायगर चित्रपट मालिकेतील तिसरा चित्रपट आहे. ठराविक ॲक्शन दृश्य आणि जबरदस्त कथानक असलेल्या या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे. या स्पाय थ्रिलर चित्रपटाचा टीझर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये रॉ एजंट असलेल्या सलमान खानची या चित्रपटातील झलक दाखवण्यात आली आहे. दुसरीकडे मार्व्हल्स सिने विश्वातील पुढील चित्रपट ‘द मार्व्हल्स’ हा देखील प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. सुपर हिरोंची थरारक कामगिरी या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. या दोन जबरदस्त चित्रपटांचा यंदाच्या दिवाळीत मुकाबला होणार आहे. यामुळे यंदाची दिवाळी आणखीनच बहारदार होणार असून मनोरंजनाची ही आतषबाजी सिने रसिकांना मंत्रमुग्ध करणारी ठरेल यात शंकाच नाही.
दिवाळीत एकीकडे आकाशात आतषबाजीला सुरुवात झालेली पाहायला मिळेल तर दुसरीकडे मोठ्या पडद्यावर जेव्हा हे चित्रपट प्रदर्शित होतील तेव्हा चित्रपट गृहातही मनोरंजनाच्या आतषबाजीला सुरुवात होईल.यामुळे यंदाची दिवाळी ही सर्वार्थाने विशेष ठरणार असून ही दिवाळी सिने रसिकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.