Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Boong: बाफ्टा जिंकलेला पहिला भारतीय चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; ‘या’ दिवशी होणार सिनेगृहात प्रदर्शित

"बूंग" हा चित्रपट अनेक प्रमुख आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर प्रदर्शित झाला आहे आणि त्याला समीक्षकांची प्रशंसा मिळाली आहे. बाफ्टा जिंकताना त्याने झूटोपिया २, लिलो अँड स्टिच आणि आर्को सारख्या चित्रपटांशी स्पर्धा केली.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 04, 2026 | 03:06 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • “बूंग” चित्रपटाची ट्रेलर प्रदर्शित
  • “बूंग” बाफ्टा जिंकलेला पहिला भारतीय चित्रपट
  • “बूंग” कधी होणार सिनेमागृहात प्रदर्शित
 

“बूंग” या भारतीय चित्रपटाला नुकताच बाफ्टा पुरस्कार मिळाला असल्याचे समोर आले आहे. हा चित्रपट ६ मार्च रोजी भारतात प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांना या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी निर्मात्यांनी त्याचा ट्रेलर रिलीज केला आहे. ट्रेलरमध्ये एका हृदयस्पर्शी कथेची झलक दिसून येत आहे. तसेच चित्रपटाच्या ट्रेलरला देखील प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

ट्रेलरमध्ये काय दिसले?

ट्रेलरमध्ये एका अशा कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे, ज्याचा कर्ता पुरुष आपल्या कुटुंबापासून दूर राहतो. पत्नी त्याला घरी परत येण्याची विनंती करते, मात्र काही कारणास्तव तो घरी येऊ शकत नाही. अशा परिस्थितीत आईला व्यथित पाहून त्यांचा लहान मुलगा वडिलांना शोधण्यासाठी एका प्रवासाला निघतो. ट्रेलरमध्ये या भावनिक प्रवासाची झलक पाहायला मिळते आहे, जिथे बालपणाची निरागसता आणि गहिरे भाव एकत्र गुंफलेले दिसत आहेत. आपल्या मातीतल्या मुळांशी जोडलेली ही कथा कुटुंब, धैर्य आणि आशा यांचा संदेश देणारा हा ट्रेलर आहे.

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान थलपती विजयचा मोठा निर्णय; पत्नी संगीताला २५० कोटींची पोटगी देण्याची ऑफर?

‘बूंग’ने बदलला इतिहास

बूंगला फ्रेंच ॲनिमेटेड सायन्स फिक्शन चित्रपट आर्को, हॉलिवूडचा लाइव्ह-अ‍ॅक्शन ॲनिमेटेड कॉमेडी लिलो अँड स्टिच आणि हॉलिवूड ॲनिमेटेड कॉमेडी झूटोपिया २ विरुद्ध नामांकन मिळाले होते. पॅडिंग्टन बेअरने मंचावर पुरस्कार प्रदान केला. बूंगचा बाफ्टा विजय हा भारतीय चित्रपटांसाठी, एक मोठी कामगिरी आहे. पुरस्कार सोहळ्यात दिग्दर्शक लक्ष्मीप्रिया देवी, फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर देखील उपस्थित होते. पुरस्कार जिंकल्यानंतर लक्ष्मीप्रियाने ज्युरी सदस्यांचे आणि बाफ्टाचे आभार मानले.

 

‘बूंग’ हा बाफ्टा पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय चित्रपट आहे. ७९ व्या ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘बूंग’ने सर्वोत्कृष्ट बाल आणि कुटुंब चित्रपट श्रेणीत बाफ्टा जिंकून इतिहास रचला आहे. बाफ्टा विजयात या चित्रपटाने ‘झूटोपिया २’, ‘लिलो अँड स्टिच’ आणि ‘आर्को’ सारख्या चित्रपटांना देखील टक्कर दिली आहे.

Ravi Dubey चा दमदार बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चर्चेत; Ramayana मधील लक्ष्मण भूमिकेसाठी तगडी मेहनत

चित्रपट कधी होणार प्रदर्शित?

हा चित्रपट ६ मार्च रोजी पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे. लक्ष्मीप्रिया देवी यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. एक्सेल एंटरटेनमेंट, चॉकबोर्ड एंटरटेनमेंट आणि सूटिबल पिक्चर्स यांच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

Web Title: Bafta winning indian film boong trailer release film will release on 6 march

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Hollywood

संबंधित बातम्या

Divorce And Home Loan : घटस्फोट झाल्यावर जॉइंट होम लोनच्या EMI चं काय? बँक कोणाकडून पैसे करते वसूल? जाणून घ्या नियम
1

Divorce And Home Loan : घटस्फोट झाल्यावर जॉइंट होम लोनच्या EMI चं काय? बँक कोणाकडून पैसे करते वसूल? जाणून घ्या नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.