शाहरुख खानने (shah rukh khan) 2002 मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या देवदास (Devdas) या आयकॉनिक चित्रपटात मुख्य भुमिका केली होती. या चित्रपटातील अनेक दृश्यांमध्ये तो मद्यधुंद अवस्थेत दिसला होता. अलीकडेच, शाहरुखच्या सहकलाकाराने खुलासा केला आहे की चित्रपटाच्या शुटींगच्या वेळी सेटवर शाहरुख खरी दारू पित होता.
[read_also content=”गॅस सिलिंडरच्या स्फोटाची रील बनवायला गेला अन् तेवढ्यात मृत्यूनं कवटाळलं! https://www.navarashtra.com/india/boy-died-while-trying-to-make-reel-of-gas-cylinder-explosion-in-kanpur-nrps-521461.html”]
देवदासमध्ये धरमदासची भूमिका साकारणाऱ्या टिकू सुल्तानियाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या चित्रपटाशी संबंधित एक मनोरंजक किस्सा शेअर केला आहे. टिकूने सांगितले की, शाहरुख चित्रपटाच्या सीनसाठी रम प्यायचा, जेणेकरुन त्याचे पात्र खरे वाटले पाहिजे. हे पाहून मी त्याला विचारले – तू काय करतोस? यावर उत्तर देताना शाहरुख म्हणाला- सर, अभिनय तर होईल, पण माझ्या डोळ्यात नशा कशी दिसेल.
शाहरुखचे कौतुक करताना टिकू पुढे म्हणाला, ‘मला त्याची ही गोष्ट खूप छान वाटली. देवदासच्या भूमिकेसाठी त्याच्या डोळ्यातही नशा दिसणं महत्त्वाचं होतं.
रिपोर्टनुसार, शाहरुखच्या आधी ही भूमिका सलमान खानला ऑफर झाली होती. पण त्याने नकार दिला होता. देवदासच्या भूमिकेसाठी निर्मात्यांनी गोविंदाचीही भेट घेतली अशीही माहिती समोर आली आहे. अनेक रिपोर्ट्सचा दावा आहे की सैफ अली खान आणि मनोज बाजपेयी यांनाही ही भूमिका करण्यास सांगितले होते. मात्र नंतर शाहरुखचे नावावार शिक्कामोर्तब झालं.
देवदास हा चित्रपट 2002 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्यांच्याशिवाय ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांच्याही मुख्य भूमिका होत्या.चित्रपटाची कथा शरतचंद्र चट्टोपाध्याय यांच्या देवदास या पुस्तकावर आधारित आहे. 2002 मध्ये कान फिल्म फेस्टिव्हलमध्येही हा चित्रपट दाखवण्यात आला होता. 50 कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 168 कोटींची कमाई केली.