टिकू तलसानिया यांच्या पत्नीने दिली प्रकृतीबद्दल दिली धक्कादायक माहिती; म्हणाल्या, "हार्ट अटॅक नाही तर..."
आपल्या विनोदी भूमिकेसाठी चर्चेत राहिलेले ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते टिकू तलसानिया यांना काल (शनिवारी) हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त समोर आले होते. पण काही तासांपूर्वी आलेल्या हेल्थ अपडेटनुसार, टिकू तलसानिया यांना ब्रेन स्ट्रोक आल्याचे वृत्त आहे. सध्या टिकू तलसानिया यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. टिकू तलसानिया यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, टिकू तलसानिया यांना शनिवारी ब्रेन स्ट्रोक आला असून त्यांच्यावर अंधेरीतल्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत.
टिकू तलसानिया यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, टिकू तलसानिया शुक्रवारी रात्री एका चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी गेले होते. जिथे अचानक त्यांची रात्री ८ वाजता तब्येत बिघडली. टिकू तलसानिया यांची अचानक रात्री तब्येत बिघडल्यामुळे त्यांना तात्काळ मुंबईतील कोकीलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर सुरुवातीला अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आला होता, असे म्हटले जात होते. पण आता टिकू तलसानियाच्या पत्नीने सांगितलं आहे की, अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आला नव्हता तर ब्रेन स्ट्रोक आला होता.
प्रसिद्ध संगीतकार गायक राहुल घोरपडे यांचं निधन; कला विश्वावर शोककळा
तलसानिया यांनी १९८४ मध्ये ‘ये जो है जिंदगी’ या टीव्ही शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. दोन वर्षांनंतर, ‘तिने प्यार के दो पल’, ‘ड्यूटी’ आणि ‘असली नकली’ या चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिथून, त्यांच्या फिल्मी करियरला सुरुवात झाली. ‘बोल राधा बोल’, ‘कुली नंबर १’, ‘राजा हिंदुस्तानी’, ‘हिरो नंबर १’ आणि ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ यांसारख्या चित्रपटांमधील मनोरंजक अभिनयाने अभिनेता प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. याशिवाय, तलसानियाने ‘गोलमाल है भाई सब गोलमाल है’, ‘जिंदगी अभी बाकी है मेरे घोस्ट’ आणि ‘साजन रे फिर झूट मत बोलो’ सारख्या लोकप्रिय शोमध्ये भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीत अनेक योगदान दिले आहे. पडद्यावर विनोदी आणि पात्रात्मक भूमिका साकारण्याच्या त्यांच्या बहुमुखी प्रतिभेमुळे ते प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. अभिनेत्याचा अभिनय चाहत्यांच्या मनात घर करून गेला आहे.
लॉस एंजेलिसच्या अग्नितांडवात अडकली अभिनेत्री प्रीती झिंटा; पोस्ट शेअर करत सांगितला धक्कादायक अनुभव
अभिनेता टिकू शेवटचे २०२४ मध्ये राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ चित्रपटात दिसले आहेत. त्याच वेळी, अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, टिकूने दीप्ती तलसानियाशी लग्न केले आहे आणि त्यांना दोन मुले आहेत. त्यांचा मुलगा रोहन तलसानिया हा संगीतकार आहे, तर त्यांची मुलगी शिखा तलसानिया हिने ‘वीरे दी वेडिंग’, ‘आय हेट लव्ह स्टोरीज’ आणि ‘कुली नंबर १’ सारख्या चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे.