प्रसिद्ध संगीतकार गायक राहुल घोरपडे यांचं निधन; कला विश्वावर शोककळा
संगीतसृष्टीतून एक दुख:द बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध संगीतकार आणि गायक राहुल घोरपडे यांचे निधन झाले आहे. त्यांचं वयाच्या ६६ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झालेय. राहुल घोरपडे यांची थोडक्यात ओळख करुन द्यायची म्हटलं तर, ते ‘सकाळ’चे माजी संपादक बाबासाहेब घोरपडे यांचे नातू आणि ‘केसरी’चे माजी संपादक चंद्रकांत घोरपडे यांचा मुलगा होते. टेलिव्हिजन, चित्रपट, नाटक आणि रंगमंचीय अविष्कार अशा सर्व माध्यमांमध्ये त्यांनी आपली छाप पाडली.
लॉस एंजेलिसच्या अग्नितांडवात अडकली अभिनेत्री प्रीति झंटा; पोस्ट शेअर करत सांगितला धक्कादायक अनुभव
राहुल घोरपडे हे इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायकांपैकी एक आहेत. त्यांच्यावर रविवारी सकाळीच पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी नाटक, संगीत आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. गायक राहुल घोरपडे आपल्या संगीत कारकिर्दीत अतिशय सुरेल आवाज आणि भावकवितांचे प्रतिभावान प्रयोगशील संगीतकार म्हणून प्रसिद्ध होते. मुख्य बाब म्हणजे, राहुल घोरपडे यांनी नाटक, चित्रपट आणि टेलिव्हिजन मालिकांमध्ये गायक आणि निर्माता म्हणून काम करत असताना अनेक जाहिराती, अनुबोधपट (Documentary) आणि अनेक नाटकांना संगीतबद्ध केले.
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
राहुल घोरपडे यांनी केलेल्या संगीत रचनांना ज्येष्ठ गायिका आशा भोसले, सुरेश वाडकर, रवींद्र साठे, अनुराधा मराठे, मुकुंद फणसळकर अशा प्रतिभावंत गायकांनी आपला आवाज दिला आहे. डॉ. माधवी वैद्य यांच्या “अग्निदिव्य” या मराठी चित्रपटाचं संगीतदिग्दर्शन राहुल घोरपडे यांनी केलं होतं. ‘बीएमसीसी’च्या ‘सुनिला पारनामे शाळेला चालली होती’, ‘सूतक’ या एकांकिका, साहिर लुधियानवी यांच्या काव्यावर आधारित ‘पडछाया’ हे सुधीर मोघे यांनी रुपांतरित केलेली संगीतिका, ‘जागर’ संस्थेची ‘नंदनवन’, ‘दंभद्वीपचा मुकाबला’, ‘राजा इडिपस’ ही नाटके आणि अनन्वय संस्थेच्या ‘कवी शब्दांचे ईश्वर’ दूरदर्शन मालिकेचे, ‘गाणी बहिणाबाईंची’, सर्व साहित्य संगीत विषयक प्रयोगांचे संगीत त्यांनी दिले होते. ‘स्वर सौरभ’ या स्वतःच्या संस्थेतर्फे ‘बनात जांभुळबनात’, ‘गाणी मंगेशकरांची’, ‘हे स्वप्नांचे पक्षी’ अशा भावगीतांच्या कार्यक्रमाची निर्मिती करून त्यांनी रंगमंचावर शेकडो प्रयोग केले होते. आपल्या चार दशकांच्या संगीत कारकीर्दीत त्यांनी शेकडो रेडिओ आणि दूरचित्रवाणी जाहिराती संगीतबद्ध केल्या होत्या.
ग्लॅमरस मीरा जगन्नाथसोबत श्रीकांत यादव करणार रोमान्स, ‘इलू इलू’ चित्रपटातील रोमँटिक अंदाज चर्चेत