लज्जास्पद, उदित नारायण यांनी लाइव्ह शोमध्येच फॅनला केलं लिप किस, Video Viral
बॉलिवूडचे लोकप्रिय गायक उदित नारायण यांनी आपल्या गाण्यांच्या माध्यमातून लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून उदित नारायण बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. आज त्यांचा आवाज स्वत:ची ओळख आहे. कायमच गाण्यांमुळे चर्चेत राहणारे उदित नारायण एका व्हिडिओमुळे तुफान चर्चेत आले आहेत. गायक उदित नारायण कायमच गायनाचे शो करत असतात. अशाच एका शोमधील सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी उदित यांच्या कृतीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ६९ वर्षीय उदित नारायण यांच्यावर टीका केली आहे.
सध्या सोशल मीडियावर उदित नारायण यांचा एका म्युझिक कॉन्सर्टमधील एक व्हिडिओ तुफान व्हायरल आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये, गायक शोमध्ये गाणं गात असताना चाहते त्यांना भेटायला येताना दिसत आहेत. त्यातीलच एका महिला त्यांना किस करताना दिसत आहे. उदित नारायण यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आलेल्या महिला चाहतीने गायकासोबत फोटो काढल्यानंतर त्यांनी किस केलं. कॉन्सर्टमधील हा किसिंगचा व्हिडीओ खूपच व्हायरल झाला असून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. व्हिडिओ ‘विरल भयानी’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेला आहे. हा शेअर करण्यात आलेला व्हिडिओ एका लाइव्ह कॉन्सर्टमधील आहे.
व्हिडीओमध्ये दिसतंय की, उदित स्टेजवर ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणं गाताना दिसत आहेत. ते गाणं गात असताना अनेक चाहते त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी येताना दिसत आहे. त्यामुळे उदित स्टेजवरून पुढे येतात आणि महिलांसोबत सेल्फी काढतात आणि त्यांच्या गालावर किस करतात. एका चाहतीने त्यांना गालावर किस केल्यानंतर त्यांनी चाहतीच्या ओठांवर किस केला, हा व्हिडीओ पाहून लोक नाराजी व्यक्त करत आहेत. व्हिडिओपाहून नेटकरी उदित नारायण यांना ट्रोल करत आहेत. “लवकरच उदित यांच्या घटस्फोटाची बातमी लवकरच येऊ शकते”, “आदित्य तुझ्या वडिलांना सांभाळ”, “आपण या सेलिब्रिटींची पूजा करतो आणि ते असे वागतात,”, “या गायकांची रिॲलिटी आता समोर येत आहे.” असं म्हणत गायकाला ट्रोल केलं आहे. अशा प्रकारच्या कमेंट्स व्हिडीओवर आहेत.
डबल नव्हे ट्रिपल धमाका, अंकुश चौधरीने केली लोकप्रिय मराठी सिनेमाच्या सिक्वेलची घोषणा
दरम्यान, अद्याप या प्रकरणावर गायक उदित नारायण यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. उदित नारायण यांनी आजवर हिंदी, तमिळ, बंगाली, मल्याळमसह विविध भाषांमध्ये गाणे गायले आहेत. अनेक चित्रपटातल्या गाण्यांमध्ये उदित यांनी प्लेबॅक सिंगर म्हणूनही काम केले आहे. त्यांचे अनेक अल्बमही गाजलेले आहे. उदित नारायण यांचे ‘पापा कहता है बडा नाम करेगा’ हे गाणे खूप जास्त लोकप्रिय झाले. या गाण्यामुळे खऱ्या अर्थाने उदित नारायण यांच्या करिअरला सुरूवात झाली.