Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘किचन कल्लाकार’च्या मंचावर उज्ज्वल निकम,राही सरनोबत

कोण मिळवेल किचन कल्लाकारचा किताब?

  • By Smita Manjrekar
Updated On: Jan 25, 2022 | 01:39 PM
प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘किचन कल्लाकार’च्या मंचावर उज्ज्वल निकम,राही सरनोबत
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: झी मराठीवरील किचन कल्लाकार या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली. या कार्यक्रमात प्रेक्षकांना कलाकारांची किचनमध्ये उडालेली तारांबळ पाहायला मिळते. या आठवड्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त कलाकार नाही तर काही सुप्रसिद्ध खास पाहुणे या किचनमध्ये महाराजांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी सज्ज होणार आहेत. ॲड. उज्ज्वल निकम (प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ व  विशेष सरकारी वकील), कृष्ण प्रकाश – (आयपीएस अधिकारी, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड) आणि राही सरनोबत – (ऑलिम्पिक पदक विजेती भारतीय खेळाडू )या खास पाहुण्यांमध्ये किचन कल्लाकारच्या किचनमध्ये चुरस रंगणार आहे.

 

वकील म्हणून आपल्या अशिलाची बाजू अगदी निर्भीडपणे मांडणाऱ्या ऍडव्होकेट उज्वल निकम यांना किचनमध्ये मात्र जिलेबी करण्याच्या आव्हानाला सामोरं जायचं आहे. इतकंच नव्हे तर राहीचा नेम किती अचूक आहे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे शेठकडून सामान मिळवण्यासाठी किचन कल्लाकारच्या किचनमध्ये राहिला आपली नेमबाजी दाखवावी लागणार आहे.

याचसोबत आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश हे किती तल्लख आहेत याची प्रचिती प्रेक्षकांना येणार आहे. कारण शेठकडून सामान मिळवण्यासाठी स्क्रिनवर भरधाव असलेल्या गाड्यांचे नंबर अचूक सांगण्याचं आव्हान त्यांनी लीलया पेललं. आता या तिघांमध्ये महाराजांना आपल्या पाककलेने कोण खुश करेल? आणि किचन कल्लाकारचा किताब कोण  मिळवेल? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Web Title: Ujjwal nikam rahi sarnobat on the stage of kitchen kallakar on the occasion of republic day nrsm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2022 | 01:33 PM

Topics:  

  • Ujjwal Nikam

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.